Saisha Bhoir Mother Arrested News, Saisha Bhoir Mother Arrested, saisha bhoir news SAKAL
मनोरंजन

बालकलाकार Saisha Bhoir च्या आईला पोलिसांनी घेतलं ताब्यात, फसवणुकीचा गुन्हा दाखल, वाचा संपूर्ण प्रकरण

बालकलाकार साईशा भोईर हिची पूजा भोईर हिला अटक करण्यात आलीये

Devendra Jadhav

Saisha Bhoir Mother Arrested News: रंग माझा वेगळा या मालिकेतून लोकप्रिय झालेली आणि सध्या नवा गडी नवं राज्य मालिकेतून लोकप्रिय झालेली बालकलाकार साईशा भोईर हिची पूजा भोईर हिला अटक करण्यात आलीये.

पूजावर फसवणुकीचा आरोप दाखल झाला असून पूजाने एका जोडप्याला १६ लाखांचा गंडा दिल्या प्रकरणी पोलिसांनी ताब्यात त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. यामुळे बालकलाकार साईशा पुढे मालिकेत काम करणार की नाही? यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय.

(rang maza vegla fame Child actor Saisha Bhoir mother arrested by police, case of fraud registered)

काय आहे नेमकं प्रकरण?

कुलाबा इथं राहणाऱ्या एका दाम्पत्याला पूजा भोईर हिनं तिच्या कंपनीत गुंतवणूक करण्यास सांगितलं. त्यांनी गुंतवणूक केल्यानंतर मात्र परतावा परत देण्याची वेळ आली तेव्हा, आकडता हात घेतला.

या दाम्पत्याला तब्बल १६ लाखांना गंडा घातल्याचा आरोप पूजा भोईर हिच्यावर करण्यात आलाय. हे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचल्यानंतर पूजा भोईर हिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. पूजा कदम- भोईर हिला कफ परेड पोलिसांनी ताब्यात घेतल्याचं समोर आलं .

आरोपी पूजा भोईर हिला काल अटक करण्यात आली आहे. 'ती सध्या पोलिस कोठडीत आहे," असं वरिष्ठ पीआय राजेंद्र रणमाळे यांनी सांगितलं आहे.

साईशाच्या आईला अटक झाल्यामुळे साईशाच्या मालिकेतील करियरवर परिणाम होणार का अशी शक्य वर्तवली जात आहे. लहान वयात साईशासाठी आईला अटक होणं ही फार मोठी घटना आहे.

साईशा सध्या नवा गडी नवं राज्य मालिकेत अभिनय करतेय. साईशाच्या कामावर या गोष्टीचा कोणताही परिणाम होणार नाही.

सेटवर तिच्याशी याबाबत बोलणे टाळलं जात आहे. तिच्या शुटिंगवर या घटनेचा कोणताही परिणाम होणार नाही, याची खबरदारी घेतली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

September 1 Rule Changes 2026 : सप्टेंबर १ तारखेपासून बदलणार ५ महत्त्वाचे नियम; सामान्यांच्या खिशावर परिणाम, LPG सिलिंडरपासून कारच्या किमतीपर्यंत मोठे बदल

Gram Panchayat Delimitation: प्रभागरचनेचे काम, तलाठ्यांना घाम ; ग्रामपंचायतीकडेच सोपवा; संघटनेची महसूल विभागाकडे मागणी

Laxman Hake: ओबीसी आरक्षणासाठी मोठा एल्गार! लक्ष्मण हाकेंची मोठी घोषणा; मुंबईकडे कूच करण्याचा निर्धार

Marathi News Live Updates : सुशिक्षित पूर्वज असल्याने आदिवासी दावा नाकारता येणार नाही, उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा

15000 Teacher Recruitment : TET ची अट रद्द! राज्यात 15 हजार शिक्षकांची मेगा भरती; 600 क्रीडा शिक्षकांसाठी स्वतंत्र पात्रता निकष जाहीर, ऑनलाईन मागविले अर्ज

SCROLL FOR NEXT