rangeela movie complete 27 years amir khan urmila matondkar jackie shroff hit movie released in 1995 sakal
मनोरंजन

या चित्रपटातील कलाकार रातोरात झाले सुपरस्टार; 'रंगीला'ची 27 वर्षे..

सुपरहीट ठरलेल्या 'रंगीला' चित्रपटाच्या काही आठवणी..

नीलेश अडसूळ

गेली २७ वर्षे झाले तरी रंगीला चित्रपटाची जादू कमी झालेली नाही. या चित्रपटातील गाणी प्रचंड हिट झाली. मग ते 'याई रे याई रे' असो किंवा 'हाय रामा' हे गाणं असो. या चित्रपटातील प्रत्येक गाणी आजही लोक आवर्जून ऐकतात. आमिर खान, उर्मिला मातोंडकर, जॅकी श्रॉफ यांची प्रमुख भूमिका असलेल्या आणि ८ सप्टेंबर १९९५ रोजी रिलीज झालेल्या या चित्रपटाला आज २७ वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्ताने जाणून घेऊया चित्रपटाच्या काही खास आठवणी. (rangeela movie complete 27 years amir khan urmila matondkar jackie shroff hit movie released in 1995)

राम गोपाल वर्मा दिग्दर्शित या चित्रपटाने बॉलीवूड मध्ये पहिल्यांदाच 'रोमँस कॉमेडी ड्रामा' हा प्रयोग करून पहिला, जो प्रचंड यशस्वी आहे.बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट यशस्वी ठरला. १९९५ हे वर्ष हिंदी चित्रपटसृष्टीत प्रेमाचे नवे पर्व सुरू करण्याचे वर्ष ठरले. या कालावधीत आणि रोमँटिक सिनेमे प्रदर्शित झाले. आता आपल्या ऑनलाईन माध्यमातून सहज चित्रपटाची तिकीट मिळते. पण तेव्हा तसे नव्हते आणि चित्रपटांचा भडीमारही नव्हता. त्यामुळे चित्रपट पाहणे हे लोकांसाठी अत्यंत जिव्हाळ्याचे होते. त्यासाठी अधिकचे पैसे मोजायलाही तयार व्हायचे. अशाच ब्लॅकने तिकीट विक्री करून उदरनिर्वाह करणाऱ्या मुन्नाची हि गोष्ट होती.

'रंगीला' या चित्रपटाने त्या काळातील सामान्य माणसांच्या स्वप्नांना पडद्यावर आणले. मध्यमवर्गीय कुटुंबात राहणारी मुलगी मिली अभिनेत्री होण्याचं स्वप्न पाहते. पुढे ते अभिनेत्री होते आणि एक मोठा अभिनेता तिच्या प्रेमात पडतो. पण मिलीचा एक जुना मित्र जो झोपडपट्टीत राहतो, तोही तिच्या प्रेमात असतो. अशा लव्ह ट्रँगलची हि अनोखी गोष्ट आहे. दोन वर्गांचे विचार, राहणीमान या सगळ्यावरच हा चित्रपट भाष्य करतो. जेव्हा वेळ येते तेव्हा मिली आपल्या झोपडपट्टीतल्या मित्राचीच साथ देते. मुन्ना आणि मिली हे दोघेही त्या काळातील समाजाचे असे दोन पैलू आहेत, जे राम गोपाल वर्माने आपल्या कथेचा आदर्श म्हणून मांडले आहेत.

'रंगीला' चित्रपटाने अनेकांचे नशीब पालटले. या चित्रपटातील सर्वच कलाकारांना रातोरात प्रसिद्धी मिळाली. या चित्रपटासाठी आमिरनेही विशेष मेहनत घेतली. झोपडपट्टीची भाषा यावी यासाठी त्याने काही दिवस ताशा वस्त्यांमध्ये जाऊन वास्तव्य केले. तिथले कपडे, तिथली टपोरी भाषा त्याने शिकली. प्रसिद्ध संगीतकार ए आर रहमान यांनाही या चित्रपटाने वेगळी ओळख मिळवून दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

५ हजार देशील तरच... अभिनेता सुशांत शेलारने खंडणी मागितली? मराठी उद्योजकाचा थेट आरोप; रेकॉर्डिंगही ऐकवली

Supreme Court on Bihar SIR Case : बिहार 'SIR' बाबत सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय! ‘आता आधार कार्ड....’

Latest Marathi News Updates : नांदगाव मतदारसंघाच्या आमदाराची पंजाबमधील आपत्तीग्रस्तांसाठी ९ लाख रुपयांची आर्थिक मदत

Hyderabad Gazette: हैदराबाद गॅझेट! बंजारा समाजाला आदिवासींचं आरक्षण कसं मिळेल? नेमका पुरावा काय सापडला?

PM Vidyalaxmi Yojana: टॉप कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतलंय? मग सरकारकडून मिळवा 3% व्याज सवलतीचं शिक्षण कर्ज, जाणून घ्या अर्ज कसा करावा!

SCROLL FOR NEXT