Rani Mukerji Indian actress Reaction On Black Movie
Rani Mukerji Indian actress Reaction On Black Movie esakal
मनोरंजन

Rani Mukerji : 'माझ्या आजवरच्या चित्रपटांमध्ये सर्वाधिक...',19 वर्षांनी 'ब्लॅक' OTT वर आला, राणीची भावूक करणारी प्रतिक्रिया!

युगंधर ताजणे

Rani Mukerji Indian actress Reaction On Black Movie : बॉलीवूडमधील आयकॉनिक चित्रपटांमध्ये ज्या चित्रपटांचे नाव घेतले जाते त्यात दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या ब्लॅक चित्रपटाचाही समावेश आहे. गेल्या काही दिवसांपासुन भन्साळी हे त्यांच्या ओटीटीवर व्हायरल झालेल्या एका बातमीनं चर्चेत आले होते. आता तर त्यांचा गाजलेला ब्लॅक हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला आहे.

बिग बी अमिताभ बच्चन यांनी देखील खास पोस्ट शेयर करत याविषयी आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. त्यात आता अभिनेत्री राणी मुखर्जीची भर पडली आहे. तिनं देखील ब्लॅक चित्रपटाविषयी तिचं मतं व्यक्त केलं आहे. या चित्रपटाबद्दल बोलताना राणी भावूक झाली आहे. ब्लॅकला नुकतीच 19 वर्षे पूर्ण झाली आणि ते सेलेब्रेट करण्यासाठी निर्मात्यांनी हा चित्रपट नेटफ्लिक्सवर रिलीज केला आहे. OTT वर लाँच झाल्यापासून, राणीला जगभरातील चाहत्यांकडून आणि चित्रपटप्रेमींकडून मोठा प्रतिसाद मिळतो आहे.

संजय लीला भन्साळी दिग्दर्शित या चित्रपटात महानायक अमिताभ बच्चन यांनी राणी मुखर्जीसोबत काम केले होते. या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर मोठा प्रतिसाद मिळाला होता. त्यातील कलाकारांना राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला होता. ब्लॅक हा आता ओटीटीवर प्रदर्शित झाला असून त्यात राणीची प्रतिक्रिया चर्चेत आली आहे.

राणी म्हणते, “ब्लॅकला 19 वर्षांनंतरही प्रेक्षकांकडून खूप प्रेम मिळत आहे हे पाहणे खूप जबरदस्त आणि आनंददायी आहे. माझ्या फिल्मोग्राफीमध्ये या चित्रपटाला विशेष स्थान आहे. दिग्गज अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम करण्याचा आणि माझे आवडते चित्रपट निर्माता संजय लीला भन्साळी दिग्दर्शित करण्याचा अनुभव माझ्यासोबत कायम राहील.”

ती पुढे म्हणते, मला आनंद आहे की हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला आहे आणि ज्यांनी 19 वर्षांपूर्वी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झालेल्या ब्लॅकची जादू पाहण्यास चुकले होते. त्यांना आता ओटीटीवर तो चित्रपट पाहता येणार आहे. या माध्यमातून तुमचे काम अधिकाधिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचते आहे हे पाहून आनंद वाटतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi Live News Update: मुंबईतील मतदान केंद्रांवर सुविधा नाहीत; आदित्य ठाकरेंनी व्हिडिओद्वारे मांडली समस्या

Navi Mumbai News: 13 वर्षाच्या मुलाने पॉर्न पाहून अल्पवयीन बहिणीला केलं गरोदर, पनवेलमधील धक्कादायक घटना

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: जावेद अख्तर, शबाना आझमींनी मुंबईत केले मतदान

Deepthi Jeevanji : भारत की बेटी सब पर भारी... दीप्तीने जपानमध्ये रचला इतिहास! 400 मीटर T20 शर्यतीत जिंकले 'गोल्ड मेडल'

IPL 2024: ECB ने निर्णय बदलला... हंगाम संपण्यापूर्वीच इंग्लिश खेळाडू परत जाण्याबाबत पंजाब किंग्सच्या कोचचा खुलासा

SCROLL FOR NEXT