rani mukerji and shah rukh khan Sakal
मनोरंजन

Rani Mukerji: राणी मुखर्जीला शाहरुखसोबत वयाच्या 80 व्या वर्षापर्यंत करायचाय रोमान्स, अभिनेत्रीने सांगितली मनातील इच्छा

बॉलीवूड अभिनेत्री राणी मुखर्जी सध्या तिचा नुकताच प्रदर्शित झालेला 'मिसेस चॅटर्जी व्हर्सेस नॉर्वे' या चित्रपटाच्या यशाचा आनंद साजरा करत आहे.

Aishwarya Musale

बॉलीवूड अभिनेत्री राणी मुखर्जी सध्या तिचा नुकताच प्रदर्शित झालेला 'मिसेस चॅटर्जी व्हर्सेस नॉर्वे' या चित्रपटाच्या यशाचा आनंद साजरा करत आहे. आशिमा छिब्बर दिग्दर्शित या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली आहे. तिच्या दमदार अभिनयासाठी अभिनेत्रीचे खूप कौतुक होत आहे.

'राजा की आयेगी बारात'मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या या अभिनेत्रीला शाहरुख खानसोबत 'कुछ कुछ होता है'मधून यश मिळाले. या अभिनेत्रीने आता खुलासा केला आहे की तिला पडद्यावर शाहरुखसोबतचा रोमान्स सुरू ठेवायचा आहे.

एका वृत्तवाहिनीच्या नुकत्याच झालेल्या संभाषणात, जेव्हा तिला विचारले गेले की ती शाहरुख खानसोबत आणखी एक चित्रपट करण्यास तयार आहे का, अभिनेत्रीने उत्तर दिले की लेखकांनी एक मनोरंजक प्रेमकथा घेऊन यावे ज्यामध्ये तिच्यासोबत शाहरुख असेल. वयाच्या 80 व्या वर्षापर्यंत मला शाहरुखसोबत रोमान्स करायला आवडेल, असे राणीने सांगितले.

राणी मुखर्जीचा चित्रपट प्रेक्षकांना आवडला, अनेक सेलिब्रिटींनीही या चित्रपटाबद्दल ट्विट केले. शाहरुख खाननेही चित्रपट पाहिल्यानंतर आपले विचार शेअर केले आणि लिहिले, "'मिसेज चटर्जी वर्सेज नॉर्वेच्या संपूर्ण टीमने किती जबरदस्त प्रयत्न केले."

राणी मुखर्जी आणि शाहरुख खान यांनी 'कुछ कुछ होता है', 'चलते चलते' आणि 'कभी अलविदा ना कहना' सारख्या चित्रपटांमध्ये स्क्रीन स्पेस शेअर केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

FSSAI च्या कारवाईचा दणका! Dabur नंतर Zandu सह ५ कंपन्यांवर कडक कारवाई; कारण काय?

Pimpalwandi News : पिंपळवंडी ग्रामस्थांचा पोलीस अधीक्षक गिल यांच्याकडे संतप्त सवाल; पिंपळवंडी येथील पोलीस आऊट पोस्ट दहा वर्षापासून बंद

Shubman Gill: "तो खेळाडू भारतासाठी दीर्घकाळ खेळेल!", श्रीलंकेविरुद्धच्या विजयानंतर गिलची मोठी भविष्यवाणी!

Marathi News Live Updates : 'आप' नेते सत्येंद्र जैन आणि इतर ४ आरोपींना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

Sangola News : सांगोल्यातील विविध पक्षातील कार्यकर्त्यांनी मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत केला पक्षप्रवेश

SCROLL FOR NEXT