Rani Mukerji reveals she had a miscarriage in 2020 say lost my baby 5 months into pregnancy  Esakal
मनोरंजन

Rani Mukerji: कोरोना लॉकडाऊनमध्ये राणी मुखर्जीचा झाला होता गर्भपात, तीन वर्षांनी केला खुलासा..

मेलबर्न 2023 च्या इंडियन फिल्म फेस्टिव्हलमध्ये राणी मुखर्जीने एक धक्कादायक खुलासा केला आहे.

Vaishali Patil

Rani Mukerji reveals she had miscarriage in 2020: बॉलीवूडमध्ये आपल्या अभिनयानं प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री म्हणजे राणी मुखर्जी. तिने आजवर अनेक प्रकारच्या चित्रपटातुन प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे.

यात कॉमेडी, थ्रिलर, क्राईम, सस्पेन्स, फॅमिली ड्रामा अशाप्रकारांचा सामावेश आहे. आता राणी मुखर्जी कोणात्याही वेगळ्या ओळखीवर अवलंबून नाही. चित्रपटांमुळे चर्चेत राहणारी राणी आज वेगळ्याचं कारणासाठी चर्चेत आली आहे.

मेलबर्न 2023 च्या इंडियन फिल्म फेस्टिव्हलमध्ये राणी मुखर्जीने एक धक्कादायक खुलासा केला आहे. ज्यामुळे तिच्या चाहत्यांना धक्काच बसला आहे. 2020 मध्ये तिचा गर्भपात झाल्याचे अभिनेत्रीने म्हटले आहे.

मेलबर्नच्या इंडियन फिल्म फेस्टिव्हलमध्ये तिच्या सिनेमॅटिक प्रवासातील अनुभव शेयर करतांना राणीने सांगितले की, 'मिसेस चॅटर्जी व्हर्सेस नॉर्वे' चित्रपटाचं शूटिंग सुरू करण्यापूर्वी ती तिच्या आयुष्यातील सर्वात वाईट आणि कठीण टप्प्यातून गेलेली होती. कोरोना काळात ती 5 महिन्यांची गर्भवती असताना तिचा गर्भपात झाला होता. त्यामुळे तिला शारिरीक आणि मानसिक वेदना होत होत्या.

यावेळी राणी म्हणाली, तिच्या चित्रपटाचे शुटिंग सुरू करण्यापूर्वी आणि नंतर ती याबद्दल काहीही बोलली नाही कारण त्यावेळी ते चित्रपटासाठी केलेले एक प्रसिद्धी स्टंट वाटले असते ,असं तिला वाटलं.

या वेदने विषयी बोलतांना ती म्हणाली की, "वर्षाच्या अखेरीस मी माझ्या दुसऱ्यावेळी गरोदर होते, परंतु दुर्दैवाने 5 महिन्यांनंतर मी माझ्या गर्भातील तो छोटासा जीव गमावला."

पुढे ती म्हणाली की, 'गर्भपातानंतर 10 दिवसांनीच निर्माता निखिल अडवाणीने मला फोन केला आणि 'मिसेस चॅटर्जी विरुद्ध नॉर्वे' या चित्रपटाची ऑफर केली.'

तिला चित्रपटाची कथा आवडली आणि तिने होकार दिला. हा चित्रपट एका सत्य घटनेवर आधारित आहे, जो सागरिका भट्टाचार्यच्या जीवनावर आधारित होता.

2014 मध्ये राणीने आदित्यशी लग्न केलं. लग्नाच्या 1 वर्षानंतर म्हणजेच 2015 मध्ये राणीने मुलगी आदिराला जन्म दिला.

राणी आणि आदित्यने कधीही त्यांच्या लग्नाची बातमी सार्वजनिक केली नाही मात्र त्यांनी आई-वडील झाल्याची सोशल मिडियावर शेयर केली होती. त्यातच राणीने तिचं दुसरं मुलं गमावल्यानं तिच्या चाहत्यांनाही धक्काच बसला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vladimir Putin: पुतीन यांचे 'हे' चार मित्र, ज्यांच्यामुळे पाश्चिमात्य देशांचं वर्चस्व संपलं; चीनमधून दिला संदेश

Mumbai News: मुंबईत ईद-ए-मिलादच्या मिरवणुकासाठी रस्ते वाहतूक बदल, पाहा पर्यायी मार्ग

Ravindra Jadeja च्या पत्नीनेही दाखवलं खेळाचं कौशल्य; लहान मुलांसोबत खेळली कबड्डी अन् रस्सीखेच; पाहा Video

Thane Crime: तलाठी कार्यालय चोरी प्रकरण! तपासात धक्कादायक खुलासा उघड; डोंबिवलीत नेमकं काय घडलं?

Latest Marathi News Updates: दौंड रेल्वे स्थानकावर प्रवाशाला लुटले

SCROLL FOR NEXT