Rani Mukherjee Birthday, Rani Mukherjee news, Rani Mukherjee family, Rani Mukherjee affair SAKAL
मनोरंजन

Rani Mukherjee Birthday: जन्मताच राणी मुखर्जीची झालेली अदलाबदली, या एका गोष्टीमुळे पटली ओळख

राणी मुखर्जीच्या जन्माच्या वेळी तिची अदलाबदल झाली आहे

Devendra Jadhav

Rani Mukherjee Birthday: आज खंडाला गर्ल राणी मुखर्जीचा वाढदिवस. राणीने आजवर अनेक सिनेमांमधून तिच्या अभिनयाची चुणूक दाखवली. राणीच्या वाढदिवसाच्या आठवड्यात तिचा नवा सिनेमा मिसेस चॅटर्जी व्हर्सेस नॉर्वे (Mrs Chatterjee Vs Norway) सिनेमा रिलीज झालाय.

आज राणी मुखर्जीच्या वाढदिवसानिमित्त एका खास गोष्टीचा उलगडा झालाय. ती घटना म्हणजे राणी मुखर्जीच्या जन्माची..

(rani mukherjee exchanged with punjabi family after she born)

राणी मुखर्जीच्या जन्माच्या वेळी तिची अदलाबदल झाली आहे. याचा खुलासा खुद्द राणी मुखर्जीने केला आहे.

अभिनेत्रीने मुलाखतीत सांगितले होते की, तिचा जन्म झाला तेव्हा हॉस्पिटलच्या व्यवस्थापनाच्या कारभारामुळे चुकून एका पंजाबी जोडप्याच्या खोलीत पोहोचली होती.

राणीच्या आईला या गोष्टीमुळे मोठा धक्का बसला होता. राणीने हि सर्व घटना मुलाखतीत उलगडली.

राणी म्हणाली, जेव्हा तिच्या आईला समजले कि तिच्या बाळाची अदलाबदली झाली. आपल्या शेजारी असलेल्या बाळाला पाहिले तेव्हा त्यांना जाणीव झाली कि ते तिचे मूल नाही. मग पुढे राणीच्या आईने डॉक्टरांना सांगितले की, तिच्या मुलीचे डोळे तपकिरी आहेत.

या एका गोष्टीमुळे राणी मुखर्जीच्या आईने डॉक्टरांना आपल्या मुलाचा शोध घेण्यास सांगितले होते. मुलाचा शोध घेता घेता तिच्या आईने एका पंजाबी कुटुंबात भेट घेतली.

राणीची आई ज्या पंजाबी कुटुंबाला भेटली होती त्या पंजाबी कुटुंबात आठव्यांदा मुलगी जन्माला आली असा समज झाला. पण मुलीच्या तपकिरी डोळ्यांमुळे आईला ओळख पटली आणि तिला तिची मुलगी परत मिळाली.

हा सर्व किस्सा सांगताना राणी म्हणाली, आजही तिचे कुटुंबीय तिला गमतीने सांगतात की ती पंजाबी आहे आणि ती चुकून त्यांच्याकडे आली आहे.

राणी ही फिल्ममेकर राम मुखर्जी यांची मुलगी आहे आणि तिचे लग्न यश चोप्रा यांचा मुलगा दिग्दर्शक आदित्य चोप्राशी झाले आहे.

आपल्या उत्कृष्ट अभिनयाने, आवाजाने आणि आपल्या सौंदर्याने वर्षानुवर्षे चाहत्यांची मने जिंकणारी अभिनेत्री राणी मुखर्जी 21 मार्च रोजी आपला 44 वा वाढदिवस साजरा करत आहे.

राणीने तिच्या कारकिर्दीत एकापेक्षा एक चित्रपट केले आहेत, कधी सून बनून तर कधी पुरुषाची भूमिका करून.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Sharma: 'अद्भूत कर्णधार, टीम इंडियाला तू शिकवलंस की...' दिनेश कार्तिकचा रोहितच्या नेतृत्वाला सलाम; पाहा Video

30th Fenesta Open Tennis: महाराष्ट्राच्या वैष्णवी अडकरने जिंकले विजेतेपद; मनिष सुरेशकुमार पुरुष विभागात विजेता

सातारा अन् पालघर जिल्ह्यातील दोन न्यायाधीश सेवेतून बडतर्फ; नेमकं प्रकरण काय?

Phulambri Protest : शेतकऱ्यांच्या मदतीवरून काँग्रेस आक्रमक तहसीलदार व काँग्रेस कार्यकर्त्यांत बाचाबाची

Latest Marathi News Live Update: दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT