Rani Mukherji
Rani Mukherji  esakal
मनोरंजन

Rani Mukherji : 'बॉलीवूडमध्ये मला एका गोष्टीवरुन नेहमीच...' राणी भावूक!

सकाळ डिजिटल टीम

Rani Mukherji bollywood actress mrs chatterjee vs norway : राणीला कुणी काहीही म्हटलं तरी तिचं वेगळेपण काही कमी होत नाही. राणीचं सौंदर्य हे चाहत्यांच्या नजरेत असायचं. त्याचं कौतूकही व्हायचं, पण याशिवाय आणखी काही गोष्टी होत्या, त्यामुळे राणीवर नेहमीच नेटकऱ्यांनी राग व्यक्त केला.

बॉलीवूडमध्ये आपल्या दमदार अभिनयानं राणी मुखर्जीनं वेगळे स्थान निर्माण केले आहे. दोन दशकांहून अधिक काळ या अभिनेत्रीनं लाखोंच्या संख्येनं चाहतावर्ग तयार केला आहे.सोशल मीडियावर राणी ही नेहमीच चर्चेत असते. तिच्या फोटोंना मिळणारा प्रतिसाद मोठा आहे. जी जेव्हा फोटो पोस्ट करते तो चाहत्यांच्या जिव्हाळ्याचा विषय असतो.

Also Read - परदेशातही वापरता येणार युपीआय सुविधा...वाचा सविस्तर

राणीचा एक काळ होता. जेव्हा तिचे फोटो पाहण्यासाठी चाहते गर्दी करायचे. राणीच्या चित्रपटांची चाहते वाट पाहत असायचे. राणीनं स्वताला सिद्ध केलं.आपण केवळ सौंदर्यानं नव्हे तर अभिनयानं देखील प्रेक्षकांच्या कौतूकास पात्र होऊ शकतो हेही तिनं दाखवून दिलं होतं. आता राणीनं एका गोष्टीनं नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.त्याला कारणही तसेच आहे. राणीनं बॉलीवूड आणि फिल्म इंडस्ट्रीमध्ये कशाप्रकारे एका वेगळ्या कारणाला सामोरं जावं लागलं हे सांगितलं आहे.

राजा की आयेगी बारात या चित्रपटाच्या माध्यमातून राणीनं पहिल्यांदा बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर तिचा प्रवास सुरु झाला. मात्र यासगळ्यात राणीच्या आवाजावरुन तिला भलंबुरं असं काही ऐकावं लागलं होतं. आपला आवाज चांगला नाही. त्यामुळे येत्या काळात त्याच्यावरुन मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागेल. असं तिला काही जणांनी तिला ऐकवलं होतं. पण राणी काही हार मानणारी नव्हती.

राणीचा येत्या दिवसात मिसेज चॅटर्जी नॉर्वे नावाचा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. ती त्या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त असल्याचे दिसून आले आहे. लोकांनी मला माझ्या आवाजावरुन खूप हिणवलं पण मी काही ऐकलं नाही. शेवटी आज मी एका वेगळ्या ठिकाणी आहे. त्याचे श्रेय माझ्यातील संयमाला आहे. असंही राणीनं यावेळी सांगितलं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Naseem Khan: 'काँग्रेसने महाराष्ट्रात का नाही दिला एकही मुस्लिम उमेदवार...', नसीम खान यांचा सवाल

'माझ्यासोबत राहा अन् मुलांना जन्म दे', दहशतवाद्यानं अंगठी देत केलं प्रपोज, हमासच्या कैदेतील तरुणीची आपबीती

Latest Marathi News Live Update: आम्ही काम करतो, इतरांसारख खोट बोलत नाही, अजित पवारांची सुप्रिया सुळेंवर टीका

Lok Sabha Election 2024 : मतदानाच्या दिवशी सुट्टी देणे बंधनकारक आहे का? काय सांगतो कायदा

Maharashtra Din 2024 : वर्ल्ड फेमस आहेत महाराष्ट्रातील 'हे' खास पदार्थ, एकदा चव चाखाल तर प्रेमात पडाल.!

SCROLL FOR NEXT