रानू मंडल Sakal
मनोरंजन

रानू मंडल झाली नवरी, काचा बदामवर धरला ठेका; पाहा व्हायरल व्हिडीओ

ती लग्नातील नवरीच्या वेशात आहे आणि काचा बदाम हे गाणं गाताना दिसत आहे.

सकाळ डिजिटल टीम

रस्त्यावर गाणं म्हणताना व्हायरल झालेली गायिका म्हणून रानू मंडलची ओळख आहे. त्यावेळी तिची खूप लोकांनी प्रशंसा केली होती. सोनू निगम याने तर तिला आपल्या स्टुडिओत गाणं गायची संधी सुद्धा दिली होती. त्याच्यानंतर ती सिलेब्रिटी झाली आणि तीच्यावर टीकाही झाली होती. नेटकऱ्यांनी तीला खूप ट्रोल केलं होतं. त्यानंतर ती आता एका वेगळ्या मूडमध्ये आपल्याला पहायला मिळत आहे. पश्चिम बंगालमधील शेंगा विक्रेता भुवनचे व्हायरल झालेले काचा बदाम हे गाणं गाताना ती व्हिडीओमध्ये दिसत आहे.

सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चेत असलेलं गाण म्हणजे काचा बदाम. हे गाण लोकांनी डोक्यावर घेतलं आहे. रानू मंडलने आता या गाण्यावर आपला आवाज लावला आहे. तीचा एक व्हिडीओ सध्या खूप व्हायरल होत आहे. ती लग्नातील नवरीच्या वेशात आहे आणि काचा बदाम हे गाणं गाताना आपल्याला दिसत आहे. हा व्हिडीओ कुणी शूट केला आहे याची माहिती अजून समोर आली नाही पण एका ट्वीटर अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.

दरम्यान या व्हिडीओवर सध्या लोकांच्या प्रतिक्रिया येत असून लोक तिला ट्रोल करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. तसेच खूप लोकांनी या व्हिडीओला शेअर केलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CISF जवानाचा सहकाऱ्यांवर गोळीबार, असिस्टंट कमांडंटसह ४ जवानांचा मृत्यू

Vani News : सासरी होणाऱ्या मानहानी अन् छळाला कंटाळून तरुणाने संपविले जीवन; स्टेटसवर व्हिडिओ ठेवत उघड केला प्रकार

Japanese Encephalitis Virus: आसाममध्ये डासांमध्ये जपानी मेंदूज्वराचा जी-१ विषाणू प्रथमच आढळला; ‘एनआयव्ही’ पुण्याचे संशोधन अमेरिकन जर्नलमध्ये प्रकाशित

Gujarat High Court: मोदींचं डिग्री प्रकरण! अरविंद केजरीवालांची याचिका फेटाळली, उच्च न्यायालयाने २५ हजारांचा दंड ठेवला कायम

जनता दुष्काळात, तहसीलदार सुट्टीवर; जिल्हाधिकाऱ्यांनी पदभारच काढून घेतला, अधिकारी उरला नावाला

SCROLL FOR NEXT