actress deepika padukon team esakal
मनोरंजन

दीपिका रणवीरच्या घरी पाळणा हलणार? तो फोटो व्हायरल

बॉलीवूडची (bollywood actress deepika padukon) प्रसिद्ध अभिनेत्री दीपिका पदुकोण आता चर्चेत आली आहे.

सकाळ डिजिटल टीम

मुंबई - बॉलीवूडची (bollywood actress deepika padukon) प्रसिद्ध अभिनेत्री दीपिका पदुकोण आता चर्चेत आली आहे. सोशल मीडियावर नेहमीच आपल्या वेगवेगळ्या पोस्टमुळे चाहत्यांच्या नजरेत भरणाऱ्या दीपिकाची गुड न्युज असल्याचे समोर आले आहे. बॉलीवूडच्या सध्याच्या आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये दीपिकाचे नाव घेतले जाते. आगामी काळात तिचे काही महत्वाचे चित्रपट प्रदर्शित होणार आहे. लग्नानंतर दीपकानं फार चित्रपटांमध्ये काम केलेलं नाही. मात्र ती जाहिरांतीमध्ये अॅक्टिव्ह असल्याचे दिसून आले. काही दिवसांपासून दीपिका आणि रणवीरचा (ranveer singh) एक फोटो व्हायरल झाला आहे. (ranveer deepika spotted hospital fans are wondering if actress is pregnant yst88)

रणवीर लग्न झाल्यानंतर चाहत्यांनी काही दिवसांपासून एकच प्रश्न विचारण्यास सुरुवात केली आहे ती म्हणजे गुड न्युज कधी देणार, गेल्या काही दिवसांपूर्वी दीपिकाच्या कपडयांमुळे ती चर्चेत आली होती. तिच्या चाहत्यांना असे वाटत आहे की, ती प्रेग्नंट आहे. या गोष्टीची चर्चा होण्याचे कारण म्हणजे त्या दोघांना एका रुग्णालयासमोर पाहिले गेले. तेव्हापासून एका वेगळ्या चर्चेला तोंड फुटले आहे. व्हाईट रंगाचं टी शर्ट घालून रणवीर तर ब्लॅक रंगाचा टॉप घालून दीपिका दिसले आणि त्यांचा तो फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला.

वास्तविक दीपिका आणि रणवीर हे त्या रुग्णालयामध्ये का गेले होते, याचे उत्तर काही समोर आलेले नाही. मात्र त्यांच्या त्या फोटोंवरुन वेगवेगळ्या प्रकारच्या चर्चेला तोंड फुटलं आहे. काही युझर्सचं असं म्हणणं आहे की, दीपिका प्रेग्नंट असल्यानं रणवीर तिला चेकअपसाठी घेऊन गेला होता. आणखी एकानं लिहिलं आहे, मला वाटतं दीपिका प्रेग्नंट आहे. ती आपल्याला लवकरच गोड बातमी देणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जीवनमान-जीवनभान : व्यायामाने जपूया मानसिक आरोग्य

Pimpri Raja Accident: पिंप्री राजा गणेश मिरवणुकीत बेकाबू ट्रेलर घुसला; दोघांचा मृत्यू, सात जखमी, गावावर शोककळा

Pune Ganeshotsav Traffic Rules: गणेशोत्सवात पुणे मध्यवर्ती भागातील हलक्या मालवाहू वाहनांना पहाटे २ ते सकाळी ११ पर्यंतच लोडिंग-अनलोडिंगची मुभा

Education Alert: शिक्षकांच्या आंदोलनामुळे शाळा बंद राहू नयेत; आरोग्य, बाल विकास, ग्रामपंचायत विभागाला सूचना

1980s AI Photo Trend: ChatGPT वरील एक फोटो पर्यावरणाला पडतोय महागात? व्हायरल AI फोटो 'ट्रेंड'मागचं धक्कादायक वास्तव

SCROLL FOR NEXT