Ranveer Singh and Deepika Padukone esakal
मनोरंजन

Ranveer Singh and Deepika Padukone: दीपवीरच्या बाळाचं नाव काय असणार? जन्माआधीच रणवीरनं ठरवलं

Ranveer Singh and Deepika Padukone: रणवीरचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये रणवीर हा त्याच्या बाळाच्या नावाबद्दल बोलताना दिसत आहे.

priyanka kulkarni

Ranveer Singh and Deepika Padukone: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता रणवीर सिंह (Ranveer Singh) आणि प्रसिद्ध अभिनेत्री दीपिका पादुकोण (Deepika Padukone) यांनी आज चाहत्यांना गुडन्यूज दिली आहे. लवकरच दीपिका आणि रणवीर यांच्या घरी बाळाचं आगमन होणार आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन ही गोड बातमी रणवीर आणि दीपिका यांनी दिली आहे. अशताच रणवीरचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये रणवीर हा त्याच्या बाळाच्या नावाबद्दल बोलताना दिसत आहे.

रणवीर म्हणाला, "दीपिका लहानपणी खूपच क्युट दिसत होती"

एका कार्यक्रमातील रणवीरचा जूना व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये रणवीर म्हणतो, "तुम्हा सर्वांना माहीत आहे की मी विवाहित आहे आणि मला काही वर्षात मूल होईल. भावा, तुझी वहिनी (दीपिका) लहानपणी खूपच क्युट दिसत होती, मी तिला नेहमी म्हणतो की, तू मला अशी एक मुलगी दे म्हणजे माझं आयुष्य सेट होईल. मी मुलांची नावं देखील शॉर्टलिस्ट करत आहे."

पुढे रणवीर कार्यक्रमात आलेल्या शौर्यवीर नावाच्या स्पर्धकाला म्हणतो, "तुमची हरकत नसेल तर मी माझ्या बाळाला शौर्यवीर हे नावं देऊ शकतो?" यानंतर रणवीर स्टाईलमध्ये "शौर्यवीर सिंह", असं म्हणतो. आता मुलगा झाला तर रणवीर त्याचं नाव 'शौर्यवीर' असं ठेवणार का? याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.

पाहा व्हिडीओ:

सोशल मीडियावर दिली गुडन्यूज

दीपिका आणि रणवीर यांनी सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर करुन चाहत्यांना गुडन्यूज दिली आहे. त्यांनी पोस्टमध्ये लिहिलं, "सप्टेंबर 2024". दीपिका आणि रणवीर यांच्या घरी सप्टेंबर महिन्यामध्ये बाळाचं आगमन होणार आहे.

दीपिका आणि रणवीचे आगामी चित्रपट

'सिंघम अगेन' या चित्रपटातून दीपिका आणि रणवीर हे दोघे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. तसेच रणवीरच्या डॉन-3 या आगामी चित्रपटाची देखील प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs PAK Match Ban: मोठी बातमी! पाकिस्तानी खेळाडू भारतात येऊ शकतील, पण...; भारत-पाकिस्तान सामन्यांवर सरकारचा महत्त्वाचा निर्णय

अवघ्या 24 तासांत बदलणार कन्या राशीसकट आणखी दोन राशींचं नशीब ! बुधाच्या नक्षत्र परिवर्तनामुळे मिळणार पैसाच पैसा

T20 Mumbai League: श्रेयस अय्यर, अंगकृश रघुवंशी एकाच संघात! आकाश पारकर १२ लाख रुपयांच्या सर्वोच्‍च बोलीसह करारबद्ध

Tata Motors टाटा एस गोल्ड+ XL लाँच; अधिक पेलोड, अधिक कमाई, उद्योजकांसाठी नवे संधीचक्र

Vijay Thalapathy Govt Formation: तामिळनाडुत नवा ट्विस्ट! विजयच्या सत्तास्थापनेच्या दाव्याला राज्यपालांनी टाकलं होल्डवर; 'टीव्हीके'ला दिला सल्ला

SCROLL FOR NEXT