Ranveer singh Bear Grylls wild show trailer  esakal
मनोरंजन

Ranveer Vs Wild Bear Grylls : 'मला वाचव!' रणवीरनं बेयर ग्रिल्सला जोडले हात

टीव्ही मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध मालिका वाईल्ड बेयर ग्रिल्स (Wild Bear Grylls) प्रेक्षकांचे नेहमीच लक्ष वेधून घेत असते.

युगंधर ताजणे

Ranveer Vs Wild: टीव्ही मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध मालिका वाईल्ड बेयर ग्रिल्स (Wild Bear Grylls) प्रेक्षकांचे नेहमीच लक्ष वेधून घेत असते. बेयरनं आतापर्यत आपल्या या मालिकेच्या माध्यमातून जगभरातील वेगवेगळ्या सेलिब्रेटींना सहभागी करुन घेतले आहे. भारतातील सेलिब्रेटींच्या बाबत बोलायचे (Entertainment News) झाल्यास त्यानं देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, बॉलीवूडचा खिलाडी अक्षय कुमार, दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांनाही बेयरनं आपल्या (Documentary Show) त्या साहसी कार्यक्रमामध्ये सहभागी करुन घेतले होते. सध्या हा कार्यक्रम पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. त्याचे कारण बॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता रणवीर सिंग (ranveer singh) बेयरसोबत जंगल सफारीला गेला होता. त्यावेळी त्याला मोठ्या बिकट प्रसंगाला सामोरं जावं लागलं होतं. अशावेळी त्यानं जीव वाचवण्यासाठी बेयरला विनंती केली.

रणवीर हा बॉलीवूडमध्ये त्याच्या वेगळ्या अंदाजासाठी ओळखला जाणारा (Bollywood News) अभिनेता आहे. तो चर्चेत राहण्यासाठी नेहमीच वेगवेगळ्या प्रकारच्या करामती करताना दिसतो. त्यामुळे त्याला नेटकऱ्यांकडून मिळणारा प्रतिसादही मोठा आहे. नेटफ्लिक्सनं आता इंस्टावरुन रणवीर व्हर्सेस वाईल्ड नावाच्या कार्यक्रमाचा ट्रेलर व्हायरल केला आहे. त्याला आतापर्यत लाखो नेटकऱ्यांचा प्रतिसाद मिळाला आहे. वाईल्ड विथ बेयर ग्रिल्स नावाचा हा ट्रेलर असून तो नेटकऱ्यांना आवडला आहे. त्यामध्ये रणवीरसमोर आलेल्या अस्वलालानं अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे. रणवीर सिंग हा त्या अस्वलासमोर आला आणि अडकून पडला. अशावेळी त्याला आपली त्या संकटातून सुटका कशी करुन घ्यायची असा प्रश्न पडला होता. तेव्हा त्यानं बेयरला साथ घातली अन् सुटका करुन घेतली. असं त्या ट्रेलरमधून आपल्याला दिसून येते.

नेटफ्लिक्स इंडिया तो ट्रेलर व्हायरल करताना लिहिलं आहे की, जंगल में मंगल, रणवीर व्हर्सेस वाईल्ड, आपल्या सर्वांना लवकरच हा थरार नेटफ्लिक्सवर पाहता येणार आहे. आतापर्यत या ट्रेलरला नेटकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे. त्यावर त्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रियाही दिल्या आहेत. रणवीरला आपण कुठे या जंगलात येवून पोहचलो असे झाले आहे. यापूर्वी देखील बेयरच्या या साहसी कार्यक्रमामध्ये अनेक सेलिब्रेटींना जीवघेण्या अनुभवाचा सामना करावा लागला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi Video : ''भारतात तुम्ही मला सुरक्षा देऊ शकत नाही का?'', राहुल गांधींची पोलिसांबरोबर बाचाबाची, नेमकं काय घडलं? पाहा VIDEO

Mumbai Health Report: राज्यात पावसाळी आजारांचा कहर; मुंबईत सर्वाधिक रुग्णांची नोंद

ब्रिटिशांच्या १८८१ व करवीर संस्थानच्या १९०२ च्या गॅझेटिरमध्ये मराठा व कुणबी एकच, तरीही मराठा समाजाला झगडावं लागतय; कोल्हापुरात आंदोलन पेटणार

Indira Ekadashi 2025: पूर्वजांना मुक्त करण्यासाठी महिलांनी काय करू नये, जाणून घ्या नियम

Latest Marathi News Updates : परतीच्या पावसामुळे पाणीपातळीत वाढ, मुंबईतील धरणांत ९८.८२ टक्के पाणीसाठा

SCROLL FOR NEXT