ranveer singh 
मनोरंजन

रणवीर सिंग 'या' गोष्टीमुळे एका इंटरव्ह्युमध्ये रडून रडून झालेला बेजार.. व्हिडिओ व्हायरल

सकाळवृत्तसेवा

मुंबई- बॉलीवूड अभिनेता रणवीर सिंगने त्याच्या उत्तम अभिनयाच्या जोरावर बॉलीवूड इंडस्ट्रीमध्ये त्याची वेगळी ओळख निर्माण केली आहे. रणवीर मधली एनर्जी भल्या भल्यांना मागे टाकते. रणवीर अभिनयासोबत आणखी एका गोष्टीसाठी प्रसिद्ध आहे ते म्हणजे सततचा त्याचा हसता खेळता स्वभाव.. स्वतःच्या स्वभावाने सगळ्यांना हसता खेळता ठेवणारा रणवीर सिंग जेव्हा स्वतः इमोशनल होऊन रडून रडून बेजार होतो तेव्हा...रणवीरचा हा इमोशनल अवतार तुम्ही कधी पाहिला नसेल. 

रणवीर सिंगचा एक व्हिडिओ सध्या सोशल मिडीयावर चांगलाच व्हायरल होतोय. रणवीरचा हा एक जुना व्हिडिओ आहे. हा व्हिडिओ त्या दरम्यानचा आहे जेव्हा रणवीरने इंडस्ट्रीमध्ये त्याच्या करिअरविषयी खुलासा केला होता. त्यावेळी रणवीरला त्याच्या चाहत्यांचा चांगला सपोर्ट मिळत होता. रणवीरच्या करिअरचा चढता आलेख पाहून त्याला अभिनेत्री सिमी गरेवालच्या टॉक शोमध्ये बोलवण्यात आलं होतं. या इंटरव्ह्युमध्ये त्याने त्याच्या आयुष्यातील अनेक गोष्टी शेअर केल्या होत्या. याच इंटरव्ह्युमध्ये सिमी गरेवालने रणवीरला सरप्राईज देण्यासाठी त्याच्या आईचा व्हिडिओ शोमध्ये दाखवला होता.

या व्हिडिओमध्ये रणवीरच्या आईने त्याच्या करिअरचा सुरुवातीच्या संघर्षाबद्दल खुलासा केला होता. रणवीरची आई म्हणाली, 'एकेकाळी रणवीर जेव्हा घरी यायचा तेव्हा तो एकंच म्हणायचा आई आजचा दिवस खराब गेला. मी त्याची आई असल्याने मला त्याचा चेहरा बघुनंच समजायचं की तो अस्वस्थ आहे. आम्हाला काळजी वाटू नये यासाठी तो काहीच सांगायचा नाही. मात्र आता तो यशस्वी झाल्याने त्या जुन्या दिवसांबद्दल आम्हाला आवर्जुन सांगत असतो. त्याला कोणकोणत्या गोष्टींचा सामना करावा लागला.त्याने त्याच्या अडचणी आमच्यापासून नेहमीच दूर ठेवल्या. आता जेव्हा आम्ही त्याच्या जुन्या गोष्टी ऐकतो तेव्हा आम्हाला कळतं कि एवढ्या यशाच्या शिखरावर पोहचण्यासाठी त्याला किती मोठा संघर्ष करावा लागला ते.'

आईचा हा व्हिडिओ पाहताना रणवीर भावूक होतो आणि इंटरव्ह्युमध्येच रडायला लागतो. त्यामुळे रणवीरला असं रडताना पाहून सिमी गरेवार त्याला शांत करण्याचा प्रयत्न करते. हा व्हिडिओ सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होतोय.   

ranveer singh cried after listen mother emotional message in simi garewal show  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महात्मा गांधींच्या पुतळ्याला भाजपची टोपी, हातात पक्षाचा झेंडा; NDAच्या शिबिरात नेत्यांचा प्रताप, काँग्रेसचा हल्लाबोल

Maharashtra Politics : ३२ टक्के राजकारणी घराणेशाहीचे प्रतिक; ‘एडीआर’च्या अहवालातील महाराष्ट्राची स्थिती

Pune News : पुण्यातील शेतकऱ्याच्या अनोख्या आंदोलनाची चर्चा; तीन वेळा आमरण उपोषण करूनही दखल नाही, आता थेट कारवरच...

IND vs PAK Asia Cup 2025: पहलगाम हल्ल्यानंतर युद्ध केलंत, तेही नीट केले नाही, मागे हटायला...; पाकिस्तानी खेळाडूचं वादग्रस्त विधान

Wholesale Inflation India : घाऊक महागाईचा दर वाढला! 4 महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचली आकडेवारी, सामान्य जनतेला फटका

SCROLL FOR NEXT