Rocky aur Rani Ki Prem Ranveer Singh Dance With Grandfather:  Esakal
मनोरंजन

Ranveer Singh Grandfather: शेवटी ते रणवीरचेच आजोबा, झुमका गिरा रे वाजलं, बाबा थिरकले!

या व्हिडिओत रणवीर सिंग त्याच्या आजोबांसोबत 'झुमका गिरा रे' या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे.

Vaishali Patil

Ranveer Singh Dance With Grandfather: सध्या मनोरंजन विश्वात बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग आणि आलिया भट्टचा नुकताच प्रदर्शित झालेला 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या चित्रपटाची चर्चा आहे. या चित्रपटातील रॉकी अन् रानीची जोडी प्रेक्षकांचे खुप मनोरंजन करत आहे. करण जोहरच्या चित्रपटाने अवघ्या 5 दिवसांत बॉक्स ऑफिसवर 63 कोटींच्यावर कमाई केली आहे.

चित्रपट रिलिज होऊन आता पाच दिवस झाले असले तरी रणवीर ,आलिया अन् करण जोहर तिघंही या चित्रपटाचे प्रमोशन करत आहेत. कधी दोघंही रॉकी- राणी चित्रपटाचे टी-शर्ट घालतात तर कधी या चित्रपटाच्या गाण्यावर डान्सही करतांना दिसतात. दोघंही चित्रपटासंबधीत फोटो आणि व्हिडिओ सोशल मिडियावर शेयर करत असतात.

त्यातच आता रणवीर सिंगनं कहरच केला आहे. रणवीर सिंगने त्याच्या आजोबांसोबत एक व्हिडिओ शेयर केला आहे. 93 वर्षांच्या आजोबांसोबत पहिल्यांदाच रणवीरने फोटो शेयर करत चाहत्यांना त्यांची ओळख करुन दिली. त्याच्या आजोबांना पाहिल्यानंतर रणवीर सिंगला इतकी एनर्जी कुठून मिळते हे समजलं आहे.

रणवीर सिंगने व्हिडिओत टिम रॉकी अन् व्हाट झुमका अशा नावाचे टी-शर्ट घातले आहे. या व्हिडिओत तो आजोबांसोबत 'झुमका गिरा रे' या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. तर दुसऱ्या व्हिडिओ आजोबा 'टिक्की सोडा, टकीला आणा' असं म्हणत आहेत.

हा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाले आहेत. नेटकऱ्यांच्या यावर अनेक प्रतिक्रिया देखील येत आहे. त्यात अनेक कलाकारांनी देखील यावर कमेंट शेयर केली आणि आजोबांच्या एनर्जीच कौतुक केलं आहे.

'रॉकी और रानी की प्रेम कहानी' चित्रपटात आलिया भट्ट, जया बच्चन, धर्मेंद्र, शबाना आझमी आणि चुर्णी गांगुली, क्षिती जोग यांच्या महत्वाच्या भुमिका आहेत. 160 कोटींच्या बजेटमध्ये तयार करण्यात आलेला हा चित्रपट लवकरच 100 कोटींचा टप्पा पार करेल अशी आशा निर्माते आणि चाहत्यांना आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Local : मध्य रेल्वेचा पुन्हा खोळंबा, विक्रोळीजवळ तांत्रिक बिघाड; लोकल ३० ते ४० मिनिटं उशिरा, स्थानकांमध्ये गर्दी

Stock Market Today: शेअर बाजाराची सकारात्मक सुरुवात! IT शेअर्सचा जोरदार कमबॅक; पाहा कोणते शेअर्स वाढले?

T20 WC, IND vs ZIM: टिम इंडियात ट्विस्ट... संघाचा विश्वासार्ह फिनिशर परतला; आता समीकरणच बदलणार?

आमच्यामध्ये वाद आहेत... भावासोबतच्या नात्यामधील तणावावर पहिल्यांदाच बोलला अजिंक्य देव; म्हणाला- एक भाऊ म्हणून ...

केंद्राकडून निधी मिळेना, मंत्र्यांचं रडगाणं; पाठपुरावा करा म्हणत राहुल नार्वेकरांनी विधानसभेत दोन नेत्यांना फटकारलं

SCROLL FOR NEXT