Ranveer Singh may enter in Comic Book world
Ranveer Singh may enter in Comic Book world  esakal
मनोरंजन

जयेशभाई फेम रणवीरची कॉमिक विश्वातही होणार 'जोरदार' एन्ट्री?

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : बॉलीवूडमधील सर्वात उत्साही कार्यकर्ता म्हणून रणवीर सिंह (Ranveer Singh) याच्याकडे पाहिले जाते. रणवीर सिंह आता जयेशभाई जोरदार (Jayeshbhai Jordaar) या चित्रपटाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. त्याच्या या विनोदी धाटणीच्या चित्रपटाची अनेक दिवसांपासून चाहचे वाट पाहत आहेत. यशराज फिल्मची (Yash Raj Films) निर्मिती असलेल्या या चित्रपटात रणवीर हा वेगळ्या भुमिकेत दिसणार आहे. निर्मातांच्या दावा आहे की रणवीरला अशा भुमिकेत चाहत्यांनी यापूर्वी कधीही पाहिले नसेल. यामुळे चाहत्यांच्या मनात रणवीर विषयी झालेली इमेज पूर्णपणे बदलून जाईल.

जयेश भाई जोरदारचे डायरेक्टर दिव्यांग ठक्कर (Divyang Thakkar) यांनी चित्रपटाबरोबरच यशराज फिल्म्सचे प्रमुख आदित्य चोप्रा जयेशभाई जोरदारचे कॉमिक बुक सिरीज (Comic Book Series) देखील लाँच करण्याचा विचार करत असल्याचे सांगितले. मिड डे मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार ही कामिक सिरीज रणवीरच्या जयेशभाई जोरदार या चित्रपटातील व्यक्तीरेखेवर आधारितच असणार आहे. हे कॉमिक बुक हिंदी आणि इंग्रजी भाषेत प्रसिद्ध करण्यात येणार आहे. मिड डेला सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जयेशभाई जोरदारचे डायरेक्टर दिव्यांग आणि सहनिर्माता मनिष शर्मा यांनी जयेशभाईच्या कामिक बुकमधील पात्राबाबत आदित्य चोप्रा (Aditya Chopra) यांना माहिती दिली त्यावेळी ते या व्यक्तीरेखेवर कामिक बुक होण्यासारखे आहे असा विश्वास वाटला. मुलांना हे पात्र आवडेल असे त्यांना वाटते. त्यामुळे त्यांनी यावर कॉमिक बुक सुरू करण्याची योजना आखली आहे.

ग्लॅमरस असा रणवीर सिंह हा जयेशभाई जोरदार चित्रपटात एमदम साध्या गुजराती व्यक्तरेखेत दिसणार आहे. या चित्रपटात शालिनी पांडे देखील दिसणार आहे. हा चित्रपट 13 मे रोजी प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे जयेशभाई जोरदार ही चित्रपटांची मालिका असण्याची शक्यताही काही सूत्र व्यक्त करत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sunetra Pawar: बारामतीत सुनेत्रा पवारांची उमेदवारी भाजपच्या दबावातून दिली का? अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं

Rahul Gandhi Pune Sabha : ''मोदी आता ओबीसी असल्याचं सांगत नाहीत...'' राहुल गांधींनी पुण्याच्या सभेत सांगितलं कारण

MI vs KKR Live IPL 2024 : अय्यरची 70 धावांची खेळी, मुंबईसमोर विजयासाठी 170 धावांच आव्हान

SSC-HSC Result 2024 : सीबीएसईचा दहावी-बारावीचा निकाल २० मे नंतर होणार जाहीर

West Indies T20 WC 24 Squad : विंडीजच्या संघात सगळे स्टार मात्र इन फॉर्म जादूगारच मिसिंग

SCROLL FOR NEXT