Ranveer Singh shares first poster of 83 movie on Kapil dev 
मनोरंजन

रणवीरनं शेअर केलं '83' मधल्या लिटील मास्टरचं पोस्टर

वृत्तसंस्था

मुंबई : भारताने पहिल्यांदा 1983 मध्ये विश्वकरंडक पटकाविला, आता याच घटनेला उजाळा देत भारतीय संघाच्या कामगिरीवर '83 The Film' या नावाचा चित्रपट बनविण्यात येत असून, रणवीर सिंग कपिल देवची भूमिका करणार आहे. काल याच चित्रपटाचे पोस्टर रिलीज झाले. यात तो 1983 मधला 83 हा ऐतिहासिक आकडा सुवर्ण अक्षरात कोरला आहे. हे पोस्टर रणवीरने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केलंय. तर आज त्याने आणखी एक स्पेशल पोस्टर रिलीज केलंय. त्यात एक खेळाडू दिसतो... कोण आहे हा खेळाडू?

आज रणवीरने एक पोस्टर रिलीज केलंय. त्यात त्याने एका खेळाडुचा लूक शेअर केलाय. हा फोटो आहे, लिटल मास्टर सुनिल गावसकर यांचा! ताहीर राज भसीन हा अभिनेता '83'मध्ये गावसकरांची भूमिका साकारत आहेत. बॅटींग करतानाचा हा लूक शेअर केल्याच्या काही वेळातच व्हायरल झालाय. 1983मध्ये भारताला वर्ल्डकप मिळवून देण्यात गावसकरांचा मोठा वाटा होता. गावसकर हे कपिल देवच्या टीममधले उत्तम क्रिकेटर होते. त्यामुळे त्यांचेच पोस्टर रणबीरने सर्वप्रथम रिलीज केले आहे. आता एक एक खेळाडूंची उकल होत जाईल व कोणता अभिनेता कोणत्या क्रिकेटपटूच्या भूमिकेत असेल हे लवकरच प्रेक्षकांना कळेल. त्याने यापूर्वी सर्व टीमचा एक स्पेशल फोटोही शेअर केला होता.

रणवीरने या चित्रपटाच्या शूटींगला धर्मशाला स्टेडियममध्ये सुरवात केली आहे. त्याने यापूर्वीही ट्विटरवर कपिल देव सोबतचे फोटो शेअर केले आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन कबीर खान करत आहे. रणवीरने या चित्रपटासाठी फेब्रुवारीपासूनच बलविंदरसिंग संधू यांच्या मार्गदर्शनाखाली तयरीला सुरवात केली आहे. बलविंदरसिंग 1983च्या विश्वकरंडक जिंकणाऱ्या भारतीय संघात गोलंदाज होते.

रणवीर त्यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबईमध्ये दिवसाआड दोन तास सराव करत होता. हा चित्रपट 1983च्या विश्वकरंडकावर आधारित आहे. या चित्रपटात रणवीर व्यतिरिक्त आर. बद्री, चिराग पाटील, आदिनाथ कोठारे, पंकज त्रिपाठी या कलाकारांचाही समावेश आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maratha Reservation: १९९४ चा जीआर नेमका काय आहे? मराठा समाज आरक्षणाबाहेर राहिला, कारण...

Pachod News : चौकशीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांच्या धमकीने घाबरलेल्या शेतकऱ्याने विहिरीत उडी घेऊन संपविले जीवन

Latest Marathi News Updates: भाजपमध्ये घराणेशाही नाही- देवेंद्र फडणवीस

कोकणातलं तुम्हाला काय आवडलं? दिलीप प्रभावळकर म्हणाले, 'ते पाहून मीच चकीत झालो कारण...

BCCI ची अब्जावधींची कमाई होते तरी कशी? भारताच्या तुलनेत पाकिस्तान क्रिकेट बोर्ड किती कमावतो पैसा, जाणून घ्या

SCROLL FOR NEXT