Ranveer Singh to become SRK’s neighbour, buy Rs 119 crore new house in bandra sakal
मनोरंजन

शाहरुखच्या शेजारी दीपिका रणवीरनं घेतलं अलिशान घर, किंमत ऐकूण व्हाल थक्क..

अभिनेत्री दीपिका पदूकोण आणि रणवीर सिंग यांनी वांद्रे येथे शाहरुख खानच्या शेजारी नवे घर घेतले आहे.

नीलेश अडसूळ

Ranveer Singh Buy New House : बॉलीवूडमधील सर्वाधिक लोकप्रिय जोडी म्हणून रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण यांच्याकडे पाहिले जाते. या दोन्ही सेलिब्रेटींचा चाहतावर्ग मोठा आहे. दीपिकाला तर सोशल मीडियावर सर्वाधिक फॉलोअर्स आहे. (Bollywood actors news) आता दीपिका आणि रणवीर चर्चेत (Deepika Padukone) आले आहे. त्याचे कारण म्हणजे त्यांचे नवीन घर. हो.. रणवीर सिंग आणि दीपिकाने वांद्र्यात नवीन घर घेतले आहे. या घराची किंमत ऐकून सर्व सामान्यांचे डोळे फिरतील.

रणवीर सिंह (Ranveer Singh) आता शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) शेजारी होणार अशी जोरदार चर्चा आहे. कारण रणवीर सिंहने वांद्र्यामध्ये एका इमरातीमध्ये चार मजले (क्वाड्राप्लेक्स घर) घेतले आहे. नुकताच रणवीर आणि त्याच्या वडिलांनी हा कोट्यवधींचा रुपयांचा व्यवहार केला आहे. रणवीर सिंह याने घेतलेले नवीन घर शाहरुख खान याच्या मन्नत बंगल्याजवळ आहे आणि घराची किंमत अंदाजे 119 कोटी रुपये इतकी आहे. या व्यवहारानंतर रणवीर दीपिका शाहरुखचे शेजारी होणार असल्याचे बोलले जात आहे.

एका माध्यमाने दिलेल्या माहितीनुसार, रणवीर सिंह आणि त्याचे वडिल जुगजीत भवनानी यांच्या ओह फाईव्ह ओह मीडिया वर्क एलएलपी कंपनीने 8 जुलै रोजी वांद्रा बॅन्डस्टँड येथील सागर रेशम इमारतीमध्ये 16, 17, 18 आणि 19 असे चार मजले विकत घेतले आहेत. याची किंमत अंदाजे 119 कोटी आहे. या घराची स्टॅम्प ड्युटीच 7.13 कोटी इतकी भरण्यात आली आहे. यामध्ये रणवीरला 11,266 sq. ft इतका कारपेट एरियासह 1300 स्क्वेअरफूटचे टेरिस आणि 19 कार पार्किंगच्या जागा असे डिल करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Middle Class: 5 मिनिटांत बँक बॅलन्स 43,000 रुपयांवरून 7 रुपयांवर आला; भाड्यापासून ते EMIपर्यंत.. मध्यमवर्ग आर्थिक संकटात

Latest Maharashtra News Updates : एरंडोल तालुक्यात सलग दुसऱ्या दिवशी समाधानकारक पाऊस

Supreme Court: सरकारी बंगला रिकामा करून ताब्यात घ्या; माजी सरन्यायाधीशांच्या निवासस्थानाबाबत न्यायालयाचे पत्र

Prithvi Shaw: ठरलं! मुंबई सोडलेल्या पृथ्वी शॉला मिळाला नवा संघ, आता ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात खेळणार

Video: धक्कादायक! रिलसाठी अल्पवयीन मुलाने ट्रेन ट्रॅकवर जीव धोक्यात टाकला, व्हायरल व्हिडिओ

SCROLL FOR NEXT