मनोरंजन

Ranveer Singh: रणवीर सिंग पुढील वर्षी करणार ‘शक्तिमान’चे चित्रीकरण

भारतीय सुपरहिरो ‘शक्तिमान’च्या भूमिकेमुळे सध्या तो चर्चेत आहे

सकाळ वृत्तसेवा

अभिनेता रणवीर सिंग त्याच्या अतरंगी स्वभावामुळे आणि रंगाढंगामुळे नेहमीच चर्चेत असतो.

मागील वर्षी त्याचा ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ हा चित्रपट आला होता. या चित्रपटाने बॉक्स आॅफिसवर चांगली कमाई केली होती. भारतीय सुपरहिरो ‘शक्तिमान’च्या भूमिकेमुळे सध्या तो चर्चेत आहे.

मुकेश खन्ना यांची ही मालिका चांगलीच लोकप्रिय ठरली होती. आता त्यावर चित्रपट येत असून त्यामध्ये रणवीर सिंग शक्तिमानची भूमिका साकारत आहे. या चित्रपटाचे शूटिंग पुढील वर्षाच्या मे महिन्यात सुरू होणार आहे.

‘शक्तिमान’ हा चित्रपट रणवीरसाठी तसेच प्रेक्षकांसाठी एक नवीन अनुभव असणार आहे. या चित्रपटाचे लेखन मागील तीन वर्षांपासून सुरू होते. आता टीमने चित्रपटाची स्क्रिप्ट पूर्ण तयार केली आहे. हा चित्रपट १९९७ मध्ये आलेल्या ‘शक्तिमान’ या हिंदी मालिकेशी प्रेरित आहे

. तसेच ‘सोनी पिक्चर्स इंडिया’ आणि साजिद नाडियादवाला निर्मित या चित्रपटाचे दिग्दर्शन बासिल जोसेफ करणार असल्याचे समोर आले आहे.

दरम्यान, रणवीर सध्या त्याच्या ‘डॉन ३’ आणि ‘सिंघम अगेन’ या चित्रपटांच्या तयारीत व्यस्त आहे. ‘डॉन ३’ भारतात आणि परदेशात सात महिन्यांच्या कालावधीत शूट केले जाईल आणि मार्च २०२५ पर्यंत तो पूर्ण होईल, अशी अपेक्षा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Alert : पुढचे २४ तास महत्त्वाचे मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता

Kasba Ganpati Pune: पुण्यातल्या कसबा गणपती मंडळाकडून दिलगिरी व्यक्त; विसर्जन मिरवणुकीला १३४ वर्षांत पहिल्यांदाच उशीर

IND vs WI : शुभमन गिलची विंडीज मालिकेतून माघार? मोहम्मद सिराजच्या वेगवान चेंडूवर दुखापत; BCCI च्या डॉक्टरांची पळापळ

Nepal PM: संयुक्त राष्ट्रांच्या अधिवेशनात नेपाळच्या पंतप्रधानांची जागतिक व्यवस्थेवर जोरदार टीका; भारताचाही उल्लेख

PM Kisan 24th Installment : पीएम किसानच्या २४व्या हप्ता ऑक्टोबरमध्ये मिळणार? शेतकऱ्यांना प्रतीक्षा; दसऱ्यापूर्वी खात्यात जमा होण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT