Badshah and Mrunal Thakur spark dating rumours Esakal
मनोरंजन

Badshah and Mrunal Thakur: बादशाह खरंच मृणालला डेट करतोय? 'त्या' पोस्टमुळे चर्चांना उधाण

प्रसिद्ध रॅपर बादशाह अभिनेत्री मृणाल ठाकूरच्या अफेअरच्या बातम्यावर गायकाने मौन सोडले आहे.

Vaishali Patil

Badshah and Mrunal Thakur spark dating rumours: बॉलिवूड सेलिब्रिटींच्या दिवाळी पार्टीचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. यातच आणखी एक व्हिडिओमुळे सोशल मिडियावर अनेक चर्चांना उधाण आले आहे. तो व्हिडिओ होता बॉलिवूड अभिनेत्री मृणाल ठाकूर आणि गायक बादशाह यांचा.

अलिकडेच दोघांनी शिल्पा शेट्टीच्या दिवाळी पार्टीला हजेरी लावली होती. यावेळी मृणालने बादशाहचा हात धरला होता आणि मृणाल ठाकूर आणि बादशाह दोघेही एकाच कारमधून बाहेर जाताना दिसले.

या व्हिडिओमुळे दोघे एकमेकांना डेट करत आहेत की काय अशा चर्चा सुरु होत आहे. आता मृणाल आणि बादशाह एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा सुरु असली तरी मृणालने या अफवांवर मौन बाळगले आहे.

Badshah Post:

मात्र दुसरीकडे बादशाहने मात्र इंस्टाला स्टोरी शेयर करत या अफवांना आणखी हवा दिली आहे. बादशाहने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट करत लिहिले की, 'आता समजण्याचा प्रयत्न करा, नाणं फेकलं गेलं आहे' (तो समझने की कोशिश कर, सिक्का उछाला गया है). बादशाहची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

तर दुसरीकडे मृणालने बादशाहसोबतचा एक फोटो शेअर केला होता. ज्यामध्ये ती बादशाह आणि शिल्पा शेट्टीसोबत पोज देताना दिसली होती. बादशाहनेही मृणालचा हा फोटो रिपोस्ट केला आहे.

वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर मृणाल ठाकूर नुकतीच 'पिप्पा' या चित्रपटात दिसली आहे. आता ती हे नाना या साऊथ चित्रपटात दिसणार आहे.

तर बादशाह बद्दल बोलायचं झालं तर मृणालच्या आधी बादशाहचे नाव पंजाबी अभिनेत्री ईशा रिखीसोबतही जोडले गेले होते. बादशाहने 2012 मध्ये जास्मिन मसिहसोबत लग्न केले, पण 8 वर्षांनी त्यांचा घटस्फोट झाला. दोघांनाही एक मुलगी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Cotton Market : कापूस बाजारात 'मंदीची' सरकी; १५ लाख गाठींचे उद्दिष्ट असताना साडेसात लाखांवरच हंगाम आटोपला!

रायगडाच्या पायवाटेवर 'कमळी'चा स्वराज्याचा जागर! चित्रीकरणादरम्यान विजया बाबर झाली भावूक; म्हणाली...

Jalgaon News : जळगावात थरार! सिलिंडरच्या स्फोटात तीन घरे जळून खाक, डोळ्यांदेखत संसाराची झाली राखरांगोळी

Latest Marathi News Update : धक्कादायक! जळगाव जिल्ह्यात ‘दूषित’ पाणीपुरवठा

Sunil Tatkare On NCP: अजित पवारांच्या राष्ट्रवादीचं विलिनीकरण होणार का? भवितव्य सांगून सुनील तटकरेंचं मोठं वक्तव्य; काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT