Raqesh Bapat Hospitalised esakal
मनोरंजन

Raqesh Bapat Hospitalised : शमिता शेट्टीचा एक्स बॉयफ्रेंड राकेश रुग्णालयात दाखल

राकेशनं त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवरुन एक व्हिडिओ शेयर केला आहे.

युगंधर ताजणे

Raqesh Bapat Hospitalised: टीव्ही मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध अभिनेता अन् सेलिब्रेटी राकेश बापटची धक्कादायक बातमी समोर आली आहे. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. राकेशनं सोशल मीडियावर पोस्ट करुन याविषयीची अधिक माहिती दिली आहे. गेल्या काही महिन्यांपूर्वी राकेश आणि शमिता शेट्टी यांच्यातील डेटिंगची चर्चा चांगलीच रंगली होती.

राकेशनं त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवरुन एक व्हिडिओ शेयर केला आहे. त्यात तो रुग्णालयात उपचार घेताना दिसतो आहे. त्या फोटोमध्ये भलेही त्याचा चेहरा दिसत नसला तरी त्यानं थर्मामीटरचा इमोजी शेयर करुन चाहत्यांचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला आहे. राकेश हा नेमक्या कोणत्या कारणामुळे रुग्णालयात दाखल झाला हे समजू शकलेले नाही. त्यामुळे चाहते काळजीत आहेत.

Also Read - Adhik Shravan Maas : अधिक श्रावण मास चित्तशुद्धीचा पर्वकाळ

शमितासोबतची डेटिंग चर्चेत आली....

राकेश हा शमितासोबत २०२१ मध्ये बिग बॉस ओटीटीच्या पहिल्या सीझनमध्ये दिसला होता. त्यात तो मोठ्या प्रमाणात लोकप्रियही झाला होता. त्याचवेळी त्याची शोमधील स्पर्धक शमिता शेट्टी सोबत ओळख झाली. त्यांच्यात मैत्री वाढली आणि नंतर ते एकमेकांच्या प्रेमातही पडले. शो च्या दरम्यान कपल्स म्हणून त्याची जोरदार चर्चाही झाली. बिग बॉस संपल्यानंतर ते एकमेकांना डेटही करत होते.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ते आता एकमेकांपासून वेगळेही झाले आहेत. सोशल मीडियावर त्या दोघांनी ब्रेक अप झाल्याची घोषणाही केली होती. आता ते एकत्र नाहीत. आता राकेशच्या रुग्णालयात दाखल झाल्याच्या बातमीनंतर चाहत्यांना धक्का बसला असून तो लवकरात लवकर बरा व्हावा म्हणून त्याला काळजी घेण्याचा सल्लाही दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran-America War: वडिलांच्या हत्येचा बदला घेणार! मोज्तबा खामेनेई यांची शपथ; युद्ध भडकणार?

Supriya Sule: 'लाडकी बहीण' योजनेत भाऊ कसा?; सुप्रिया सुळे यांचा महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल; कर्जमाफीची फक्त घोषणाबाजी!

Maratha Reservation: अंतरवाली सराटी लाठीमार प्रकरण; मराठा आंदोलकांवरील ३९ गुन्हे मागे, १० प्रस्ताव न्यायालयात प्रलंबित

Gangapur Accident: गंगापूर-वैजापूर रस्त्यावर भीषण अपघात! एसटी-दुचाकीची समोरासमोर धडक; शिर्डीच्या तरुणाचा जागीच मृत्यू

India vs England 5th T20 : पाचव्या टी-२० सामन्यातही भारताचा लाजिरवाणा खेळ; इंग्लंडने दिले २५८ धावांचे आव्हान, बटलर-हॅरी ब्रूकची तुफानी खेळी

SCROLL FOR NEXT