The rare treasure from Jaishankar Danve is now in the National Film Museum 
मनोरंजन

जयशंकर दानवे यांच्याकडील दुर्मिळ खजिना आता राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयात  

सकाळवृत्तसेवा

पुणे  : दिवंगत अभिनेते आणि दिग्दर्शक जयशंकर दानवे यांच्या वैयक्तिक संग्रहातील चित्रपटविषयक दुर्मिळ खजिना आता राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाला मिळाला आहे. दानवे यांच्या कुटुंबीयांनी नुकताच कोल्हापूर येथे हा दुर्मिळ ठेवा संग्रहालयाचे संचालक प्रकाश मगदूम यांच्याकडे सुपूर्द केला.

मराठीबरोबरच हिंदी चित्रपटसृष्टी गाजविणारे दानवे हे पुण्यात जन्मलेले आणि अगदी सुरवातीला त्यांनी मराठी आणि उर्दू नाटकांमध्ये कामे केली. त्यानंतर १९३०च्या सुमारास कोल्हापूर येथे चित्रपट दिग्दर्शक, निर्माते भालजी पेंढारकर यांच्याकडे सहदिग्दर्शक म्हणून काम करण्यास सुरवात केली.

‘सावकारी पाश’ (१९३६), ‘सासुरवास’ (१९४६), ‘मीठभाकर’ (१९४९ ), ‘मोहित्यांची मंजुळा’ (१९६३), ‘मराठा तितुका मेळवा’ (१९६४) आणि ‘आंधळा मारतो डोळा’ (१९७३) अशा चित्रपटांतील त्यांच्या भूमिका अविस्मरणीय ठरल्या होत्या. १९३५ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘असिरे हवीश’ या उर्दू चित्रपटातून त्यांनी अभिनेता म्हणून मोठ्या पडद्यावर पदार्पण केले. १९३० आणि १९४० च्या दशकांत त्यांनी अनेक हिंदी आणि उर्दू चित्रपटांतून कामे केली. ज्येष्ठ अभिनेते पृथ्वीराज कपूर आणि राज कपूर या दोघांचीही भूमिका असलेल्या वाल्मीकी (१९४६) चित्रपटातही दानवे यांनी काम केले होते.

संग्रहात काय आहे?
- असंख्य दुर्मिळ छायाचित्रे
- हॅंडबिल्स, गाण्यांच्या पुस्तिका
- वृत्तपत्रीय कात्रणे, त्यांच्यावर आलेले लेख,
- जुनी कागदपत्रे, पुस्तके
- कृष्णधवल छायाचित्रे,
- दानवे यांच्या हस्ताक्षरात लिहिलेली काही नाटके
- त्यांनी हॅम्लेट (१९३३) नाटकात वापरलेले काही विग, मिशा

भारतीय चित्रपटसृष्टीतील एका ‘युगा’तील एक ज्येष्ठ अभिनेता आणि दिग्दर्शकाचा हा संग्रह मिळाल्यामुळे राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयातील खजिना आणखी समृद्ध झाला असून आहे. संशोधकांना याचा उपयोग होणार आहे.
- प्रकाश मगदूम, संचालक, राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur News :दीक्षाभूमी विकासाच्या संथ गतीवर उच्च न्यायालयाचा संताप; आठवडाभरात उत्तर सादर करण्याचे आदेश

Latest Marathi News Live Update : पुण्यातील उद्योजक सचिन लोणकर यांच्यावर जीवघेणा हल्ला; हल्ल्यानंतर घटनास्थळावरून आरोपी फरार

Satara Rare Softshell Turtle : निसर्गाची किमया! साताऱ्यात आढळले मऊ पाठीचे आणि लांब मानेचे दुर्मीळ कासव; वाघाप्रमाणं मिळतंय कायदेशीर संरक्षण, वैशिष्ट्ये काय?

MPSC Success Story: आईने खानावळ चालवली, वडील माथाडी कामगार; लेकीने MPSCत गाजवले नाव, विशाखा शिर्केंची प्रेरणादायी यशोगाथा

Akola Nazul Plot Action : मनपाच्या कारवाईला स्थगितीची मागणी ; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आयुक्तांना निर्देश नजूल भूखंडावरील रहिवासी, व्यावसायिकांना दिलासा; दोन्ही बाजू ऐकून घेण्याची शिवसेनेची मागणी

SCROLL FOR NEXT