rashami  
मनोरंजन

लॉकडाऊनमध्ये रश्मी देसाई बनली डान्सर, गेंदा फूल गाण्यावर लावले ठुमके

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देश लॉकडाऊन असताना अत्यावश्यक सेवा पुरवणारे कर्मचारीच फक्त काम करताना दिसत आहेत. देशाची परिस्थिती गंभीर असल्याने हा लॉकडाउन आणखीन वाढवणार असल्याची शंका आहे. सरकार या संकटातून बाहेर पडण्यासाठी दिवसरात्र प्रयत्न करत आहेत. यातच संपूर्ण चित्रपटसृष्टी थंडावली आहे. मालिका आणि चित्रपटांचे चित्रीकरण देखील बंद करण्यात आले आहे. सतत चित्रपट आणि मालिकांच्या चित्रीकरणामध्ये व्यस्त असलेले हे कलाकार देखील घरात बसले आहेत. सगळेच कलाकार या क्वारंटाईन दिवसात नवनवीन गोष्टी करताना दिसत आहेत. कोणी शेफ बनलय, तर कोणी घराची साफसफाई करत आहेत.  क्वारंटाईनच्या काळात सर्वच जण आपला बराचसा वेळ सोशल मिडियावर घालवताना दिसतात. या क्वारंटाईनमध्ये सोशल मिडियावर हॅशटॅश सेफ हॅण्ड चॅलेंज, अन्टिंल टुमॉरो चॅलेंज, साडी चॅलेंज, डॅल्गोना कॉफी चॅलेंज, पिलो ड्रेस चॅलेंज, मी एट 20 चॅलेंज सारखे बरेच चॅलेंज ट्रेडिंग आहेत. हे चॅलेंज बऱ्याचशा सेलिब्रेटिंनी देखील स्वीकारले आहे.

असच एक चॅलेंज  बिग बॉस फेम अभिनेत्री रश्मी देसाईने स्वीकारलं आहे. हे चॅलेंज आहे गेंदा फूल चॅलेंज.  गायक आणि रॅपर बादशाहच काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झालेले 'गेंदा फूल' या गण्यावरून हे चॅलेंज तयार करण्यात आलं आहे.  या चॅलेंजमध्ये बादशाहच्या या गाण्यावर डान्स करायचा आहे. हे चॅलेंज रश्मीने देखील स्वीकारलं आहे. नुकताच तिने या गाण्यावर डान्स करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. 

हे गेंदा फूल चॅलेंज तिला तिची मैत्रीण अभिनेत्री दीपिका सिंह गोयल हिने दिले आहे. या गाण्याला रश्मीने तीच हे आवडतं गाणं असल्याचेही सांगितले आहे. तिचा हा गेंदा फूल गाण्यावरचा परफॉर्मन्स फारच छान आहे. तिच्या स्टनिंग मुव्हजने चाहत्यांना इम्प्रेस केलं आहे.

ती या व्हिडिओमध्ये फारच सुंदर दिसत आहे. हा व्हिडीओ शेअर करताना तिने कॅप्शन लिहिले आहे की, 'थँक्यु दीपिका सिंग मला गेंदा फूल या गाण्यावर डान्स करण्याची संधी दिलीस. हे गाणं माझं सध्याचं खूपच आवडतं गाणं आहे. ' रश्मीच्या या डान्स व्हिडिओला चाहत्यांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. रश्मी शिवाय हे चॅलेंज बिग बॉस फेम अभिनेत्री हिमांशी खुराणा आणि अभिनेता मनीष पौल यांनीही ही स्वीकारलं होत. त्यांचेही व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी खुशखबर! ऑगस्ट महिन्याचा हप्ता खात्यात जमा होण्यास सुरूवात, १५०० की ३०००? असं करा चेक

Ashutosh Ranka Detained : कॉकरोच जनता पार्टीचे नेते आशुतोष रांका यांच्यासह अनेकांना आसाममध्ये घेतलं ताब्यात

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या औषध निरीक्षक पेपरफुटीप्रकरणी मोठी अपडेट

Central Railway: दिवाळी, छठपूजेसाठी मध्य रेल्वेच्या ४१८ गाड्या, आरक्षण सुरू; 'अशी' करा सीट बुक

IND vs WI, 1st ODI: नमन धीरचे भारतासाठी पदार्पण! जडेजाचे कमबॅक, पण सिराजला जागा नाही; कशी आहे Playing XI

SCROLL FOR NEXT