Ranveer Singh,Rashmi desai Sakal
मनोरंजन

Ranveer Singh: रणवीर अन् जॉनी सिन्सची 'ती' अ‍ॅड पाहून भडकली टीव्ही अभिनेत्री; म्हणाली, "आम्ही मालिकांमधून संस्कृती दाखवतो.."

Ranveer Singh and Johnny Sins ad: एका अभिनेत्रीनं जॉनी सिन्स आणि रणवीर यांच्या जाहिरातीबद्दल एक पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट शेअर करुन तिनं संताप व्यक्त केला आहे.

priyanka kulkarni

Ranveer Singh: अभिनेती रणवीर सिंग (Ranveer Singh) आणि पॉर्नस्टार जॉनी सिन्सची (Johnny Sins) जाहिरात सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. काही लोक या बोल्ड जाहिरातीचा भाग असल्याबद्दल रणवीरचे कौतुक करत आहेत, तर काही जण या अॅडवर टीका करत आहेत. अशातच आता एका अभिनेत्रीनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन या जाहिरातीबाबत संताप व्यक्त केला आहे.

रश्मी देसाईची पोस्ट

अभिनेत्री रश्मी देसाईनं इन्स्टाग्रामवर रणवीर सिंग आणि जॉनी सिन्स यांच्या अॅडबाबत एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिनं लिहिलं,"अत्यंत अनपेक्षित असलेली ही रील पाहिल्यानंतर, वाटले की, हा सर्व टेलिव्हिजनमध्ये काम करणाऱ्या लोकांचा अपमान आहे. कारण आम्हाला नेहमीच कमी लेखलं जातं. अनेक छोट्या पडद्यावरील कलाकारांना मोठ्या पडद्यावरही काम करायचे आहे. पण आम्हाला नेहमी अशीच वागणूक मिळते. इथे प्रत्येकजण मेहनत घेत आहे."

रश्मी म्हणाली, "टीव्ही शोमध्ये हे दाखवले जात नाही"

रश्मीनं पुढे लिहिलं, "टीव्ही शोमध्ये हे सर्व दाखवले जात नाही. हे सर्व मोठ्या पडद्यावर दाखवले जाते.वास्तव दाखवण्यात काहीच गैर नाही पण सर्व टीव्ही इंडस्ट्रीसाठी ही एक रिॲलिटी चेक आहे. कारण मला हे कानाखाली दिल्या सारखं वाटत आहे. कदाचित मी यावर ओव्हर रिॲक्ट करत आहे पण आम्ही आमच्या प्रेक्षकांना संस्कृती आणि प्रेम दाखवतो. या जाहिरातीमुळे मी दुखावले गेले. आहे कारण टीव्ही इंडस्ट्रीत माझा एक सन्मानजनक प्रवास आहे. आशा आहे की आपण सर्व भावना समजून घ्याल."

Rashmi desai

जाहिरातीत नेमकं काय दाखलंय?

रणवीर आणि जॉनी सिन्सच्या अॅडमध्ये सिरीयलचा सीन दाखवण्यात आला आहे. या सीनमध्ये रणवीर हा एका प्रोडक्टची माहिती देताना दिसत आहे. हे प्रोडक्ट मेन्स सेक्शुअल हेल्थचे आहे. रणवीर आणि जॉनी सिन्स यांच्या या जाहिरातीवर अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nashik News: सिंहस्थाच्या पर्वावर उत्तर महाराष्ट्राच्या पर्यटनाला ‘बूस्ट’! नाशिक-शिर्डी-त्र्यंबक ‘धार्मिक कॉरिडॉर’ने जोडले जाणार, पर्यटनवाढीची संधी..

Republic Day Marathi Wishes 2026: प्रजासत्ताक दिनानिमित्त प्रियजनांना पाठवा देशभक्तीपर हटके शुभेच्छा, वाचा एकापेक्षा एक संदेश

Elon Musk Fraud : लग्नाचं आमिष, महागडे गिफ्ट्स...'इलॉन मस्क' ने मुंबईच्या महिलेला फसवलं? 16 लाख रुपये लुटले, पाहा जगभर गाजलेलं प्रकरण काय

Latest Marathi news Live Update: "२७ जानेवारी हा आपल्या राज्यासाठी खूप महत्त्वाचा दिवस ..." मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी

Education News : विद्यार्थ्यांना मोठा दिलासा! एलएलबी आणि बीएड 'सीईटी' नोंदणीला मुदतवाढ; पाहा नवीन वेळापत्रक

SCROLL FOR NEXT