Rashmika mandana manager allegedly cheats her of ₹80 lakh  SAKAL
मनोरंजन

Rashmika Mandana: रश्मिकाची झाली ८० लाखांची फसवणूक, जवळच्या व्यक्तीने केला विश्वासघात

रश्मिका मंदान्ना हिच्याकडे अनेक वर्षांपासुन कामावर असलेल्या मॅनेजरने ₹80 लाखांची फसवणूक केल्याचा आरोप आहे.

Devendra Jadhav

Rashmika Mandana News: मिडीया रिपोर्टनुसार, मिशन मजनू आणि पुष्पा यांसारख्या चित्रपटांमधील भूमिकांसाठी ओळखली जाणारी लोकप्रिय अभिनेत्री रश्मिका मंदान्ना हिच्याकडे अनेक वर्षांपासुन कामावर असलेल्या मॅनेजरने ₹80 लाखांची फसवणूक केल्याचा आरोप आहे.

(Rashmika mandana manager allegedly cheats her of ₹80 lakh)

या घटनेची माहिती मिळाल्यावर, रश्मिकाने तिच्यासोबत सुरुवातीपासूनच असलेल्या मॅनेजरसोबतचा संबंध त्वरित संपवला.

मॅनेजरने रश्मिकाकडून 80 लाख रुपयांची फसवणूक केल्याची माहिती आहे, तरीही रश्मीकाने अद्याप या घटनेबाबत अधिकृत विधान जाहीर केलेले नाही. रश्मिकाने तिच्या मॅनेजरला कामावरुन काढलं असुन हे प्रकरण खाजगीरित्या हाताळलं आहेट्

Greatandhra.com च्या सूत्रांनी खुलासा केला की, "रश्मिकाला तिच्या मॅनेजरने ₹80 लाखांची फसवणूक केल्याची चर्चा आहे. वरवर पाहता, तिला याबद्दल कोणतंही प्रकरण तयार करायचं नव्हतं. म्हणून, तिने तिच्या मॅनेजरला काढून टाकून स्वतःहून हे सर्व हाताळले. ."

ईतकी मोठी फसवणुक झाली असली तरीही रश्मिका शांत आहे. हा धक्का असूनही, रश्मिकाकडे आगामी प्रोजेक्टच्या शुटींगला सुरुवात केलीय.

रश्मिका आता रणबीर कपूर, अनिल कपूर आणि बॉबी देओल यांच्यासोबत संदीप रेड्डी वंगा दिग्दर्शित अॅनिमलमध्ये दिसणार आहे, जो 11 ऑगस्टला रिलीज होणार आहे.

सध्या, रश्मिका पुष्पा: द रुल चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. सुकुमार दिग्दर्शित या चित्रपटात तिने मुख्य अभिनेता अल्लू अर्जुनसोबत श्रीवल्लीची भूमिका साकारली आहे.

जसजसे पुष्पा: द रुलचे शूटिंग पुढे जात आहे, तसतसे चाहते रश्मिकासाठी आपला पाठिंबा दर्शवत आहेत. एकुणच छोट्या गोष्टींची चर्चा करणारे सेलिब्रिटींनी रश्मिकाकडून शिकलं पाहीजे. रश्मिकाने अत्यंत शांतपणे प्रकरण हाताळले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Beed Cyber Fraud: विधवेची सरकारी मदत सायबर भामट्याने लांबवली; सिम कार्डाच्या सहाय्याने खाते केले लिंक

Latest Marathi News Live Update : भारताच्या मीराबाई चानूनं रौप्य पदक पटकावलं

Beed News: पेट्रोलमध्ये आढळले पाणी; बीड शहरातील पंपावर नागरिक झाले संतप्त

RSS 100 Years : सोलापुरात २२७० स्वयंसेवकांचे पथसंचलन; अनेक ठिकाणी पुष्पवृष्टी; राष्ट्रीय पंचसूत्रीची घोषणा

Pankaja Munde: पण, आमच्या लेकरांच्या ताटातले घेऊ नका;आरक्षणावरून पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे यांचे मत

SCROLL FOR NEXT