Rashmika Mandana: Esakal
मनोरंजन

Rashmika Mandana: माझ्यात अन् मॅनेजरमध्ये सगळं.. मॅनेजरने 80 लाखाला फसवल्यावर श्रीवल्लीच्या टिमच्या पत्राने भुवया उंचावल्या

Vaishali Patil

Rashmika Mandana: साऊथची प्रसिद्ध अभिनेत्री श्रीवल्ली म्हणजेच रश्मिका मंदाना ही नेहमीच चर्चेत असते. ती भारतीय नव्हे तर जगभरातील प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करते आहे. तिने बॉलीवूडमध्येही एंट्री केली आहे. तिला बॉलिवूडमध्ये पहिलाच ब्रेक बिग बी यांच्यासोबतच्या चित्रपटात मिळाला. मात्र सध्या एका कारणामुळे ती खुपच चर्चेत आली.

रश्मिकाची तिच्या मॅनेजरने फसवणूक केल्याची बातमी सध्या वाऱ्यासारखी पसरली होती. तब्बल 80 लाखांची फसवणूक केल्यामुळे रश्मिकाने मॅनेजरला काढल्याचं बोललं जात होतं. मात्र याबाबत रश्मिका किंवा तिच्या टिमनं काही अधिकृत माहिती दिली नव्हती. त्यामुळे तिचे चाहतेही विचारत पडले होते.

दरम्यान रश्मिकाने या प्रकरणावर मौन सोडत आपली प्रतिक्रिया दिली आहे. खर तर रश्मिकाच्या टीमने एक निवेदन जारी करत याविषयी माहिती दिली आहे.

'रश्मिका मंदान्ना आणि तिच्या व्यवस्थापकाने अलीकडेच वेगळे होण्याचा निर्णय दोघांच्या समजुतीने घेतला आहे. अधिकृत स्पष्टीकरणात, रश्मिका आणि तिच्या व्यवस्थापकाने सांगितले की त्यांच्यात कोणतेही शत्रुत्व किंवा वाद नाही.त्याचबरोबर या बातमीचे त्यांनी खंडण केले आहे.

या अफवांमध्ये कोणतेही तथ्य नसुन या अफवांचे खंडन करत त्यांनी म्हटले आहे की, दोघांमध्ये फसवणुकीचे कोणतेही प्रकरण नाही, ही केवळ अफवा होती. आमच्यात कोणतेही वैर नाही. या अफवांमध्ये तथ्य नाही.

या अधिकृत निवेदनानंतर आता या अफवांना ब्रेक लागणार आहे अशी अपेक्षा देखील रश्मिकाच्या टीमनेही व्यक्त केली आहे.

सध्या, रश्मिका पुष्पा: द रुल चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. सुकुमार दिग्दर्शित या चित्रपटात तिने मुख्य अभिनेता अल्लू अर्जुनसोबत श्रीवल्लीची भूमिका साकारली आहे.

तर रश्मिकाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, रश्मिका पुढे रणबीर कपूर-स्टार अॅनिमल या चित्रपटात दिसणार आहे.

संदीप रेड्डी वंगा दिग्दर्शित या चित्रपटात अनिल कपूर आणि बॉबी देओल यांच्याही भूमिका आहेत. 11 ऑगस्ट रोजी चित्रपटगृहात रिलीज होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT