Rashmika Mandanna Sakal
मनोरंजन

Rashmika Mandanna: आता मला कंटाळा आलाय! रश्मिकाने दिला डान्स करण्यास दिला नकार...

रश्मिकाने तिच्या 'सामी सामी' या आयकॉनिक गाण्यावर डान्स स्टेप करण्यास नकार दिला.

सकाळ डिजिटल टीम

'पुष्पा'मध्ये श्रीवल्लीची भूमिका साकारून रश्मिका खूप लोकप्रिय झाली. या चित्रपटातील तिचे 'सामी-सामी' गाणेही खूप गाजले होते. अलीकडेच, अभिनेत्रीने तिच्या 'सामी सामी' या आयकॉनिक गाण्यावर डान्स स्टेप करण्यास नकार दिला. खरं तर, 'पुष्पा 2' स्टारने ट्विटरवर 'आस्क मी एनीथिंग सेशन' आयोजित केले होते.

दरम्यान, एका चाहत्याने रश्मिकाला विनंती केली की त्याला भेटण्याची संधी मिळाली तर तिने त्याच्यासोबत सामी-सामी गाण्यावर डान्स करावा. मात्र रश्मिकाने चाहत्यांची ही विनंती धुडकावून लावली.

ट्विटरवर चाहत्याने रश्मिकाला विचारले होते, “मला तुझ्यासोबत सामी-सामीमध्ये डान्स करायचा आहे… मी करू शकतो का?” दुसरीकडे, चाहत्याच्या या ट्विटवर रश्मिकाने उत्तर दिले की, "मी अनेक वेळा सामी सामी स्टेप केली आहे.. की आता मला वाटत आहे की मी म्हातारी झाल्यावर मला पाठीचा त्रास होईल.. तू माझ्यासोबत असं का करतोस. मी भेटल्यावर आपण वेगळं काहीतरी करूया."

डिसेंबर 2021 मध्ये 'पुष्पा' रिलीज झाल्यानंतर लगेचच रश्मिका 'समी सामी' गर्ल बनली. ती अलीकडेच एका अवॉर्ड शोसह अनेक प्लॅटफॉर्मवर गाण्यावर परफॉर्म करताना दिसली आहे. सध्या रश्मिका 'पुष्पा 2' वर लक्ष केंद्रित करत आहे. या चित्रपटात ती पुन्हा एकदा श्रीवल्लीच्या भूमिकेत दिसणार आहे.

अल्लू अर्जुन या चित्रपटात पुष्पा राजच्या भूमिकेत दिसणार आहे. रश्मिका शेवटची बॉलिवूड चित्रपट 'मिशन मजनू' मध्ये सिद्धार्थ मल्होत्रासोबत दिसली होती.तिला अमिताभ बच्चन यांच्या 'थँक गॉड'साठी सर्वोत्कृष्ट नवोदिताचा पुरस्कारही मिळाला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Eligibility Rules : ५ किलोचा 'छोटू' गॅस सिलिंडर फक्त 'या' लोकांनाच मिळणार; जाणून घ्या काय आहे नियम?

Pune News: नदी प्रदूषणमुक्तीसाठी काम करा; पुण्यातील बैठकीत पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे यांचा आदेश,‘नदी पुनरुज्जीवन प्राधिकरण’ स्थापनचा निर्णय..

Tukaram Mundhe यांची बदली का रखडली? पडद्यामागे काय घडतंय? नाशिक कुंभमेळ्याशी काय संबंध अन् सरकारमधील कोणाचा विरोध?

Atpadi Crime: लग्नं केली चार; दागिन्यांसह वधू पसार, आटपाडीत टोळी जेरबंद; लग्नाच्या आमिषाने लुबाडणूक, पाचव्या लग्न अन् काय घडलं..

Kolhapur Crime: भाताच्या कोंड्यात लपवले एक कोटीचे मद्य; तेराशे बॉक्स जप्त, पंजाबकडे जाणारा ट्रक पकडला, दोघे अटक

SCROLL FOR NEXT