Rashmika Mandanna Marriage Esakal
मनोरंजन

Rashmika Mandanna Marriage: रश्मिका मंदानाने उरकलं गुपचूप लग्न? त्याचं नाव ऐकून बसेल धक्का!

Vaishali Patil

Rashmika Mandanna Marriage: नॅशनल क्रश म्हणुन ओळखली जाणारी अभिनेत्री म्हणजे रश्मिका मंदाना. श्रीवल्लीने तिच्या अभिनय आणि सौदर्यांमुळे ती चाहत्यांच्या मनावर राज्य करत आहे, तिच्या चाहत्यांची संख्या काही कमी नाही. तिने साउथ पासून बॉलिवूडपर्यंत अभिनयाचा ठसा उमटवला आहे.

गेल्या काही दिवसांपासून रश्मिका तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. तिच्या डेटिंगच्या अफवा अनेकदा आल्या आहेत. तिचे नाव साउथ अभिनेता विजय देवरकोंडासोबत अनेकदा जोडलं गेलं आहे. दोघांचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.

मात्र आता रश्मिकाने गुपचूप लग्न केल्याचं सांगितलं आहे. मात्र तो विजय देवराकोंडा नव्हे तर तो दुसराच कोणी आहे. अलीकडेच एका मुलाखतीदरम्यान रश्मिकानं सांगितलं की ती आधीच विवाहित आहे. रश्मिकाच्या या प्रतिक्रियेमुळे तिथे बसलेल्या सर्वांनाच धक्का बसला. मात्र तिने कुणासोबत लग्न केलं आहे याचा खुलासा करताच सगळे हसु लागले. तिने एनीम कॅरेक्टर 'नारुतो'शी गुपचूप लग्न केले आहे.

रश्मिकाने एनीम कॅरेक्टर 'हिनाटा' प्रमाणे बनण्याची इच्छा व्यक्त केली त्याचबरोबर तिच्या केसांच्या जांभळा रंग व्हावा अशी देखील तिची इच्छा होती. ती म्हणाली की, 'नारुतोकडे माझं हृदय आहे. ते माझे आवडतं पात्र आहे. मी त्यांच्यासोबत लग्न केले आहे.

'नारुतो' ही जपानी अॅनिम मालिका आहे. ही लोकप्रिय मालिका आहे. अनेकांना या मालिकेनं वेडं केलं आहे. त्यांचीच चाहती आता रश्मिका झाली आहे.

रश्मिका आता 'अ‍ॅनिमल' चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात ती रणबीर कपूर आणि अनिल कपूर यांच्यासोबत काम करणार आहे. संदीप रेड्डी वंगा यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शिन केले आहे. त्याचबरोबर ती पुष्पा 2 या चित्रपटातही दिसणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

INDW vs AUSW Live: भारतीय संघाचे T20 World Cup मधून पॅकअप! ऑस्ट्रेलियाचा दणदणीत विजय अन् दक्षिण आफ्रिका उपांत्य फेरीत... हरमनप्रीत कौरच्या संघाला अपयश

IND vs IRE 2nd T20I : आयर्लंडने इतिहास रचला! भारतीय संघाला ट्वेंटी-२० मालिकेत नमवले, श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाची लाजीरवाणी सुरुवात

पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवर वाढला मृत्यूचा धोका! टोल टाळण्यासाठी 'नो-एंट्री'तून वाहनांची सर्रास एंट्री; नियमांना हरताळ

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Vidarbha Rain Alert : विदर्भासाठी दिलासादायक बातमी! पावसाचा जोर वाढणार, ११ जिल्हे यलो अलर्टवर

SCROLL FOR NEXT