Rashmika Mandanna's video of blessing newlyweds who fell at her feet goes viral netizens praise  Esakal
मनोरंजन

Rashmika Mandanna:अक्षता पडल्या अन् नवरा नवरी झाले रश्मिकापुढे नतमस्तक! नॅशनल क्रशचा क्युट व्हिडिओ व्हायरल

Vaishali Patil

Rashmika Mandanna attends assistant’s wedding Video viral netizens praise: साउथ अभिनेत्री रश्मिका मंदान्ना ही नॅशनल क्रश आहे. ती अनेकदा तिच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यामुळे चर्चेत असते. ती सोशल मीडियावर कमालीची सक्रिय असते. ती सोशल मीडियावर तिच्या पोस्ट आणि फोटोमुळे चर्चेत असते. त्याचबरोबर तिच्या लव्ह लाईफची देखील खुप चर्चा असते. सध्या रश्मिका तिच्या आगामी चित्रपटाच्या शुटिंगमध्ये व्यस्त आहे.

ती सोशल मीडियावर सक्रिय राहते, अनेकदा तिच्या चाहत्यांशी संपर्कात राहते. दरम्यान रश्मिकाने हैदराबादमधील एका लग्नात हजेरी लावील. त्या लग्नाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.

नेटकरी रश्मिकाचं कौतुक करत आहे. रश्मीकाने तिचा असिस्टंट साई बाबूच्या लग्नात हजेरी लावली. ती या लग्नात तिच्या पुर्ण टिमसोबत दिसली. यावेळी रश्मिका पारंपारिक लूकमध्ये दिली. तिने यावेळी गुलाबी रंगाची साडी परिधान केलेली होती.

सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात नवविवाहित जोडपे रश्मिकाचे पाया पडले. या जोडप्याने अनपेक्षित तिच्या पायाला स्पर्श केल्याने त्याच्या या कृत्यामुळे रश्मिका भारावून गेली, ती लाजली .

तो तिच्यासाठी खुप प्रेमळ क्षण होता. तिने देखील नवविवाहित जोडप्याला आशिर्वाद दिला. सध्या नेटिझन्स या व्हिडिओवर प्रेमाचा वर्षाव करत आहे.

वर्क फ्रंटबद्दल बोलायचं झालं तर रश्मिका मंदान्ना रणबीर कपूर स्टारर 'अॅनिमल' चित्रपटात दिसणार आहे. त्याचा हा चित्रपट 11 डिसेंबरला थिएटरमध्ये रिलीज होणार आहे.

या चित्रपटात रणबीर व्यतिरिक्त अनिल कपूर, बॉबी देओल, शक्ती कपूर आणि तृप्ती दिमरी सारखे कलाकार आहेत. हा चित्रपट संदीप रेड्डी वंगा यांनी दिग्दर्शित केला आहे.

त्याचबरोबर रश्मिकाचा पुढील वर्षी “पुष्पा 2” देखील रिलिज होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

स्कॉर्पिओला आग लागून एकाच कुटुंबातील चौघांचा अंत, मृतांमध्ये ZP सदस्यासह २ माजी सरपंचाचा समावेश

Latest Marathi News Live Update : मनोज जरांगेंची पत्रकार परिषद! 30 मे पासून आमरण उपोषण

Badlapur Crime: बदलापुरात वडिलांच्या मित्रानेच १६ वर्षीय मुलीचा केला विनयभंग, मोबाईल चार्जिंगसाठी घरी आला अन्...

Deepali Sayyad Claims : ‘महाराष्ट्र एपस्टीन फाइल्स’वरून खळबळ! दिपाली सय्यदला धमक्या, “ते नाव घेतलं तर सर्व काही संपेल...”

Kolhapur Student Death Case : बाबा दुप्पट फायदा मिळणार आहेत, पैसे पाठवा..., मुलीचे शेवटचे शब्द, कुटुंबीयांनी नाकारलं विद्यार्थिनीने नको ते केलं

SCROLL FOR NEXT