Rasika Sunil love towards ocean,actress post a photo, fans comment Instagram
मनोरंजन

Rasika Sunil: 'पोट्टी रेतीत लोळून राईली, बाप्पा...'; रसिकाच्या फोटोवर चाहत्याची भन्नाट कमेंट

रसिका सुनिल सोशल मीडियावर नेहमीच तिच्या हॉट आणि ग्लॅमरस फोटोंनी लक्ष वेधून घेताना दिसते.

प्रणाली मोरे

Rasika Sunil: 'माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकेमुळं रसिका सुनिल हे नाव घराघरात पोहोचलं. त्या मालिकेतील तिचा ग्लॅमरस अवतार सगळ्यांच्याच पसंतीस उतरला. मराठी मालिकांमधून एखाद्या अभिनेत्रीचं एवढं बोल्ड वावरणं कदाचित ते पहिल्यांदाच प्रेक्षक पाहत होते. पण रसिका बोल्ड कपडे खूप उत्तमपणे कॅरी करत असल्यानं ते कुणाला कधी खटकलं नाही. रसिकानं मालिकेतून एक्झिट घेऊन कोर्स करण्यासाठी परदेश गाठलं तेव्हा तिचे चाहते नाराज झाले होते. पण तिनं पुन्हा मालिकेत केलेली एन्ट्री तिच्या चाहत्यांना सुखावून गेली होती. नाटक,मालिका,सिनेमा अशा विविध प्लॅटफॉर्मवर रसिका सक्रिय पहायला मिळते.

रसिका सोशल मीडियावर सुपर अॅक्टिव्ह आहे. आपले फोट,व्हिडीओ,रील ती शेअर करताना दिसते. तिचे चाहतेही तिच्या पोस्टची आतुरतेने वाट पाहत असतात. आता लग्नानंतर तर तिच्या पतीसोबतच्या रील्सची देखील सोशल मीडियावर हवा आहे. दोघेही डान्स उत्तम करत असल्याने त्यांच्या डान्सचे रील्स भन्नाट असतात. रसिकाच्या पोस्टची एक महत्त्वाची आणि उल्लेखनीय गोष्ट म्हणजे रसिका अनेकदा थीम बेस्ड पोस्ट करताना दिसते. तिनं नवरात्री आणि दिवाळी निमित्तानं स्पेशल थीमवर आधारित फोटोपोस्ट केल्या होत्या. तिच्या फोटोनं चाहत्यांना अक्षरशः वेड लावलं होतं. कुणी तिला 'हॉट', कुणी 'गोड' तर कुणी 'ब्लॅक ब्युटी' म्हणून संबोधताना दिसलं.

रसिका आता पुन्हा चर्चेत आली ते तिच्या एका फोटोमुळे. सोशल मीडियावर रसिकानं समुद्राच्या पाण्यात अन् रेतीत अक्षरशः लोळण घेतलेला एक फोटो पोस्ट केला आहे. ज्यात तिनं बिकनी परिधान केली आहे,आणि अर्थातच नेहमीप्रमाणे ती त्यात सुपर हॉट दिसत आहे. अथांग पसरलेला निळाशार समुद्र, फेसाळलेल्या लाटा अन् हास्याची उधळण करत त्यात आरामात लोळण घेत आनंदानुभव घेणारी रसिका...व्वा...निसर्गाचा आनंद घ्यावा तो असा इतक्या स्वच्छ मनानं अगदी मनसोक्तपणे...

रसिकाच्या या फोटोवर चाहत्यांनी वेगवेगळ्या कमेंट्स दिल्या आहेत. कुणी तिला 'जलपरी' म्हटलंय तर कुणी 'आग' म्हटलंय, तर कुणी एका नागपुरकरानं लिहिलंय,''पोट्टी रेतीत लोळून राईली...बाप्पा...अन् हसून बी राईली...'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT