rasika sunil 
मनोरंजन

हेलिकॉप्टर प्रवास आणि बरंच काही.. रसिका सुनीलचं फिल्मी प्रपोजल

स्वाती वेमूल

आपल्या प्रियकराने अगदी स्वप्नवत प्रपोज करावं असं प्रत्येक मुलीला वाटत असतं. तर प्रेयसीला प्रपोज करण्यासाठी मुलांकडूनही अनेक प्रयत्न केले जातात. 'माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकेत शनायाची भूमिका साकारून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री रसिका सुनील हिचा बॉयफ्रेंड आदित्य बिलागीने तिला खूश करण्यासाठी सर्वांत अनोखी कल्पना अंमलात आणली. आदित्यचं फिल्मी स्टाइल प्रपोजल पाहून केवळ रसिकाच नाही तर तिचे चाहतेसुद्धा भारावले. रसिकाने सोशल मीडियावर या प्रपोजलचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट केले आहेत. आदित्यने मला सरप्राइज ड्रीम प्रपोजल भेट म्हणून दिली असून आयुष्यभर मी ते विसरू शकणार नाही, असं म्हणत रसिकाने त्या खास दिवसाविषयी सांगितलं. 

लॉस एंजिलिसमध्ये रसिका आणि आदित्यची पहिल्यांदा भेट झाली आणि तिथेच या दोघांमध्ये प्रेमाची कळी उमलली. हेच शहर हेलिकॉप्टर प्रवासाद्वारे पाहण्याची योजना आदित्यने प्रपोजलच्या दिवशी केली होती. ज्या ठिकाणी आदित्य आणि रसिका मित्र म्हणून सर्वांत आधी फिरायला गेले होते, त्या मालिबू या ठिकाणी आदित्यने तिला प्रपोज केलं. निरभ्र आकाश आणि पर्वतांच्या साक्षीने आदित्यने गुडघ्यावर बसून रसिकाला प्रपोज केलं, 'तू माझ्याशी लग्न करशील का?' आदित्य विचारण्याआधीच रसिकाचा त्याला होकार होता आणि ज्याप्रकारे त्याने प्रपोजल खास करण्यासाठी प्रयत्न केले, ते पाहून ती पुन्हा त्याच्या प्रेमात पडली. 

रसिकाने नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी आदित्यसोबतचा फोटो पोस्ट करत त्याला डेट करत असल्याचं चाहत्यांना सांगितलं होतं.  ‘दो हजार एक किस.. सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा. २०२० या वर्षभरात अनेक वाईट घडामोडी घडल्या असल्या तरी कृतज्ञ राहण्यासाठी या वर्षाने अनेक कारणं दिली आहेत’, असं कॅप्शन देत तिने आदित्यसोबतचे फोटो पोस्ट केले होते. दोन वर्षांपूर्वी ती मालिका सोडून लॉस एंजिलिस याठिकाणी पुढील शिक्षणासाठी गेली होती. तिथेच तिची आदित्यशी भेट झाली. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CAG Report : रेल्वे स्थानकातील पाणी पिता? CSMT, कल्याण, लोणावळ्यातही तपासणी; कॅगच्या अहवालात धक्कादायक खुलासा

Panvel-Karjat Local: आनंदाची बातमी! दीड तासाचा प्रवास ४० मिनिटांत पूर्ण; कर्जत-पनवेल लोकल कधी सुरु होणार? तारीख आली समोर

Gold Rate Today: सोनं खरेदीचा विचार करताय? दरात रातोरात मोठा बदल; मुंबई-पुण्यात 10 ग्रॅमचा भाव कुठे पोहोचला?

Marathi News Live Updates : महाडमध्ये केमिकल कंपनीत गॅस गळतीमुळे एकाचा मृत्यू, ८ गंभीर

MahaDBT Scheme: २९ नव्या योजना महाडीबीटीवर, घरबसल्या १०५ शासकीय योजनांचे लाभ मिळणार; मुख्यमंत्र्यांची घोषणा

SCROLL FOR NEXT