TV Actress Ratan Rajput News TV Actress Ratan Rajput News
मनोरंजन

Ratan Rajput : तो जंगलात ओढत होता अन् लोक तमाशा बघत होते; रतनने सांगितली घटना

मुलाचा पाठलाग करताना खूप समोर निघून गेली होती

सकाळ डिजिटल टीम

TV Actress Ratan Rajput News रतन राजपूत (Ratan Rajput) ही लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री (TV Actress) आहे. ‘अगले जनम मोहे बिटिया ही कीजो’मध्ये तिने ‘लाली’ची भूमिका साकारली होती. रतन राजपूत काही काळापासून टीव्हीपासून दूर आहे. परंतु, सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांशी जोडलेली आहे. रतनचे व्लॉग्स चाहत्यांना खूप आवडतात. रतन राजपूतने नवीन फोन (Mobile) विकत घेतला आहे. यानंतर तिने एका घटनेबद्दल सांगितले. तुम्हाला या घटनेबद्दल जाणून आश्चर्य वाटेल.

अभिनेत्री रतन राजपूतने (Ratan Rajput) सांगितले की, ही त्या वेळची गोष्ट आहे जेव्हा ती दिल्लीत राहायची. त्या दिवसांत ती मंडी हाउसमध्ये नाटकाचा सराव करीत असे. एके दिवशी ती मंडी हाउसमधून परतत असताना आईशी फोनवर (Mobile) बोलत होती. एका मुलाने तिचा फोन हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. मदतीसाठी जोरजोरात आरडाओरडा केला; परंतु, कोणीही मदतीसाठी पुढे आले नाही.

उभे असलेले लोकं फक्त तमाशा बघत राहिले. मदत मिळाली नाही तेव्हा ती मुलाच्या मागे दूरपर्यंत गेली. मुलाचा पाठलाग करताना खूप समोर निघून गेली होती. तेवढ्यात एक मुलगा तिथे येतो. तेव्हा ती मुलाकडे मदतीची याचना करते. परंतु, तो मुलगा तिचा हात धरतो आणि जंगलात ओढायला लागतो. रतनला जंगलाकडे ओढत तो मुलगा म्हणतो ‘आ तुझे तेरा फोन देता हूं’, असे अभिनेत्री रतन राजपूतने सांगितले.

अभिनेत्री रतन राजपूतसाठी ती रात्र भयंकर काळ्या रात्रीपेक्षा कमी नव्हती. अखेर दोन मुले तिथे येतात आणि रतन राजपूतची मदत करतात. एवढेच नाही तर दोन्ही मुल तिला सुखरूप घरी पोहोचवतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol Diesel Price: सणासुदीत पेट्रोल-डिझेल महागलं! जिओ-बीपीच्या दरवाढीनंतर सरकारी पंपांवर किती भाव? महाराष्ट्रातील नवे दर पाहा

Kochi Mini Cooper Accident : आईने वाढदिवसाला गिफ्ट केली ड्रीम कार, पोराने दारू पिऊन तिघांना चिरडले; म्हणाला- "पप्पा सगळं मॅनेज करतील"

Maharashtra Drought: ग्रामीण भागाला आधाराची गरज: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रतिपादन; केंद्रीय पथकाची दुष्काळ पाहणी पूर्ण

Latest Marathi News Live Update : सोमेश्वर साखर कारखान्याच्या निवडणुकीची आज मतमोजणी; ८३ उमेदवारांचे भवितव्य ठरणार

Beed News: जरांगे यांच्या विरोधकाला बीडच्या पालीत मारहाण

SCROLL FOR NEXT