Rathi Karthigesu Singapore's famed Bharatanatyam dancer Rathi Karthigesu dies at 87 SAKAL
मनोरंजन

Rathi Karthigesu: सुप्रसिद्ध भरतनाट्यम डान्सर रथी कार्थिगेसु यांचं निधन, वयाच्या ८७ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

सिंगापूरची प्रसिद्ध भरतनाट्यम नृत्यांगना रथी कार्थिगेसु यांचे निधन झाले

Devendra Jadhav

Rathi Karthigesu Passed Away News: सिंगापूरची प्रसिद्ध भरतनाट्यम नृत्यांगना रथी कार्थिगेसु यांचे निधन झाले. वयाच्या ८७ व्या वर्षी त्यांनी सोमवारी अखेरचा श्वास घेतला. रथी सिंगापूरमधील एका प्रभावशाली कुटुंबातील होत्या. तिचा मुलगा आनंद कार्थिगेसु वकील आहे.

रथी यांनी एक भरतनाट्यम तज्ञ याशिवाय सिंगापूरच्या प्रसिद्ध न्यायाधीशांपैकी एक असलेल्या मुतांबी कार्थिगेसु यांच्याशी विवाह केला. ज्यांचे 1999 मध्ये वयाच्या 75 व्या वर्षी निधन झाले. रथी अजून एका दु:खातून बाहेर आली नव्हती की तिच्यावर दु:खाचा दुसरा डोंगर कोसळला. पतीच्या मृत्यूनंतर काही आठवड्यांनंतर राठीने तिची मुलगी शर्मिनी देखील गमावली.

2006 मध्ये त्यांचा रथी यांचा 48 वर्षांचा मुलगा सुरेशनेही जगाचा निरोप घेतला. कार्थिगेसु या माजी ज्येष्ठ मंत्री आणि राष्ट्रपतीपदाचे उमेदवार थर्मन षणमुगररत्नम यांच्या काकू होत्या. त्यांचा भाऊ माजी खासदार पी. सेल्वादुराई आहे.

सेल्वादुराई यांनी 2001 मध्ये द संडे टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत शास्त्रीय भारतीय कलेचा प्रचार आणि आवड निर्माण करण्यात रथी यांचा प्रभाव आहे असा उल्लेख केला होता. सिंगापूर इंडियन फाइन आर्ट्स सोसायटी (सीआयएफएएस) ने रथी यांना श्रद्धांजली वाहिली. रथी यांनी यांनी काही काळ या सोसायटीच्या उपाध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळली होती

एकुणच आधी पतीचे निधन आणि नंतर मुलगा आणि मुलीचे निधन यामुळे रथी दुःखात पूर्ण बुडाल्या होत्या. त्यांच्यावर एकामागुन एक कौटुंबिक आघात होत गेले. आणि आज त्यांचंही निधन झालं. रथी यांच्या निधनाने भरतनाट्यम कलेतला मोठा तारा निखळला, अशा भावना व्यक्त होत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! लाडक्या बहिणींना ‘या’ दिवशी मिळणार प्रत्येकी ३००० रुपये; निधी मागणीची फाईल वित्त विभागाकडे; बालसंगोपन योजनेसाठीही मिळणार १०० कोटी

पोलिस ठाण्यात जाऊनही न्याय मिळत नाही, चिंता नको, आता प्रत्येक शनिवारी भेटणार ‘एसपी’! सोलापूर पोलिसांचे ‘न्याय संवाद’ ॲप, ‘या’ क्रमांकावर करा तक्रार

HSC Hall Ticket 2026: विद्यार्थ्यांसाठी मोठी अपडेट! आजपासून बारावीचे हॉल तिकीट उपलब्ध; असे करा डाउनलोड

प्रचार उद्या थांबणार! मंगळवारी रात्रीपासून उमेदवारांच्या हालचालींवर राहणार नजर; रात्री १० नंतर सोलापूर शहरातील पक्ष कार्यालये, दुकाने राहणार बंद, वाचा...

e-SIM Fraud Awareness : ई-सिम कार्डच्या नावावर फसवणूक

SCROLL FOR NEXT