anna naik 
मनोरंजन

Video : लोकलमध्ये अण्णा नाईकचा आवाज; प्रवाशांची उडाली घाबरगुंडी

स्वाती वेमूल

 झी मराठी वाहिनीवरील 'रात्रीस खेळ चाले' या लोकप्रिय मालिकेच्या पहिल्या आणि दुसऱ्या भागानंतर आता तिसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. गूढ आणि रहस्याने परिपूर्ण अशा या मालिकेची प्रचंड क्रेझ प्रेक्षकांमध्ये आहे. यातील अण्णा नाईक, माई, शेवंता, वच्छी अशा सर्वच भूमिका प्रेक्षकांना चांगल्याच लक्षात आहेत. मालिकेत अण्णा नाईक या भूमिकेचा जितका दरारा पाहायला मिळाला, तितकाच दरारा त्याचा बाहेरही आहे. अभिनेते माधव अभ्यंकर ही भूमिका साकारत आहेत. गेल्या काही दिवसांपासून या मालिकेचे प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. आता असाच एक व्हिडीओ सध्या चर्चेत आला आहे. यामध्ये चक्क लोकल ट्रेनमध्ये अण्णा नाईकांचा आवाज ऐकू येत असल्याचं पाहायला मिळतंय. अण्णा नाईक परत येणार, असं लोकलमध्ये सर्व ठिकाणी लिहिलेलं असतं. ते पाहून एक प्रवासी म्हणतो, "अरे काय हे, अण्णा नाईक परत येणार असं सगळीकडे लिहून ठेवलंय." त्यानंतर लोकलमध्ये अचानक अण्णा नाईकचा आवाज घुमू लागतो. "येणार म्हटलं तर यायलाच पाहिजे ना", असा आवाज ऐकू येतो आणि खिडकीबाहेर अण्णा नाईकची प्रतिमा दिसू लागते. हे पाहून लोकलमधल्या प्रवाशांची घाबरगुंडीच उडते. 

झी मराठीच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. 'सावधान! ते कसेही कुठूनही येऊ शकतात. अण्णा नाईक आहेत ते, परत येणारच', असं या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलंय. हा व्हिडीओ म्हणजे मालिकेचा नवीन प्रोमो आहे. येत्या २२ मार्चपासून रात्री ११ वाजता ही मालिका झी मराठी वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

या तिसऱ्या भागात अण्णा नाईकांशिवाय आणखी कोणते कलाकार झळकणार, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. प्रोमोमध्ये आतापर्यंत फक्त माधव अभ्यंकर यांनाच पाहायला मिळतंय. त्याचप्रमाणे शेवंताची भूमिका साकारणारी अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरसुद्धा झळकणार की नाही, हेसुद्धा अद्याप स्पष्ट झालेलं नाही. या मालिकेची शूटिंग कोकणातील अकेरी या ठिकाणी होते. कोरोना महामारी आणि लॉकडाउनमुळे दुसऱ्या भागाचं शूटिंग बंद पडलं होतं. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anna Hazare : जनसेवा हीच ईश्वर सेवा,आता जोपर्यंत शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंत जनतेची सेवा करणार

Pune Crime : मैत्रिणीशी बोलत असल्याच्या रागातून स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थ्याचे अपहरण करणाऱ्या आरोपींना १५ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी

Beed Scam : बीडमध्ये ७ कोटींचा महाघोटाळा! २० वर्षांच्या भाडेपट्ट्यावरील जमिनीवर डल्ला; एसबीआयचे व्यवस्थापक, सरपंचासह ६ जणांवर गुन्हा दाखल

Maratha Reservation: अभिजित दीपके घेणार मनोज जरांगेंची भेट; तारीख अन् वेळही ठरली

Marathi News Live Updates : राजकारण ते हवामान...; एका क्लिकवर वाचा दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

SCROLL FOR NEXT