Raveena Tandon News esakal
मनोरंजन

Raveena Tandon : 'मी तुझी आई की, तू माझी'! रविनानं सांगितला लेक 'राशा' चा 'तो' अनुभव

रविनानं एका मुलाखतीमध्ये आपली लेक आणि तिचा तो एक किस्सा सांगत चाहत्यांना धक्का दिला आहे.

युगंधर ताजणे

Raveena Tandon News : प्रसिद्ध अभिनेत्री रवीना टंडन ही नेहमीच तिच्या वेगवेगळ्या कारणांसाठी चर्चेत असणारी सेलिब्रेटी आहे. गेल्या काही दिवसांपासून रविनी ही लाईमलाईटमध्ये आली आहे त्याचे कारणही खास आहे. तिची नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. ती सध्या त्याच्या प्रमोशनमध्ये व्यस्त असल्याचे दिसून आले आहे.

कर्मा कॉलिंग असे रविनाच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या सीरिजचे नाव आहे. ज्याची बऱ्याच दिवसांपासून चर्चा रंगली होती. ९० च्या दशकांत आपल्या अभिनयानं प्रेक्षकांना भुरळ पाडणाऱ्या अभिनेंत्रीमध्ये रविनाचे नाव घेतले जात होते. तिनं आपल्या अभिनयानं चाहत्यांना जिंकून घेतले. सध्या ती तिची लेक राशामुळे चर्चेत आली आहे.

रविनानं एका मुलाखतीमध्ये आपली लेक आणि तिचा तो एक किस्सा सांगत चाहत्यांना धक्का दिला आहे. रविनानं यावेळी तिच्या लेकीविषयी अनेक गोष्टींना उजाळा दिला आहे. कर्मा कॉलिंगवरुन रविना ही चर्चेत आहे. त्यावरुन तिला नेटकऱ्यांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रियाही मिळत आहेत. रवीना ही चार मुलांची आई आहे. मात्र तिचे सध्याचे फोटो पाहिल्यावर रविनाचा फिटनेस चर्चेचा विषय आहे.

रविनानं पूजा आणि छाया नावाच्या दोन मुली दत्तक घेतल्या आहेत. या सगळ्यात तिच्या मोठ्या लेकीची राशाची नेहमीच चर्चा होत आहे. तिनं तिच्या स्वभावाविषयी सांगितलं आहे. रविना म्हणते की, आजच्या नव्या पिढीकडून खूप काही शिकण्यासारखे आहे. मला ते राशाकडे पाहिल्यावर जाणवते. ते खूपच वेगळ्या पद्धतीनं विचार करतात. आता माझी राहा ही ९० च्या दशकांतील कपडे परिधान करताना दिसत आहे. ते माझेच कपडे आहेत.

रविनासोबत तिच्या लेकीनं राशानं देखील काही फोटो इंस्टावर शेयर केले आहेत. त्या फोटोंवरुन चाहत्यांनी त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहे. राशाला देखील जुन्या कपड्यांची फार आवड आहे. त्यावरुन मला तिची अनेकदा बोलणी खावी लागतात. मी तिची आई आहे की ती माझी...हेच मला अनेकदा कळत नाही. आता माझी एक सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. त्यावरुन मी खूप टेन्शनमध्ये असल्याचे रविनानं सांगितले आहे.

माझ्या त्या टेन्शनवरुन राशाही मला बोलते.त्यावर तिचे पती तिला बोलतात की, तू १८ वर्षांची आहे की ८१ वर्षांची. अशा प्रकारे मला नव्या पिढीकडून खूप नव्या गोष्टी शिकायला मिळतात. अशी प्रतिक्रिया रविनानं दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Price Hike: दिवाळीच्या आधीच महागाईचा तडाखा; एलपीजी गॅसचे दर वाढले, तुमच्या शहरात किती झाली किंमत?

Latest Marathi News Live Update : पिकाचा पंचनामा करताना तलाठ्याला सर्पदंश

Video: अन् त्याने जोरात आईला ओढलं; तीन वर्षांच्या चिमुकल्याने पाच सेकंदात वाचवला आईचा जीव

Kids Health: लठ्ठ मुलांना प्रौढावस्थेत आरोग्याचा गंभीर धोका 'या' समस्या उद्‍भवण्याचा तज्ज्ञांचा इशारा

Shivaji Maharaj Video: छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील रिझर्व बँक पाहिली का? व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT