Raveena Tandon 
मनोरंजन

Raveena Tandon: मुंबईतील चौकाला रवीना टंडनच्या वडिलांचं नाव; अभिनेत्रीनं शेअर केले खास फोटो

Raveena Tandon: जुहू येथील चौकाला रवीना टंडनचे (Raveena Tandon) वडील आणि प्रख्यात चित्रपट निर्माते रवी टंडन यांचे नाव देण्यात आलं आहे.

priyanka kulkarni

Raveena Tandon: अभिनेत्री रवीना टंडनचे (Raveena Tandon) वडील आणि प्रख्यात चित्रपट निर्माते रवी टंडन यांच्या जयंतीनिमित्त भारतीय चित्रपट उद्योगातील त्यांच्या महत्त्वपूर्ण योगदानाची दखल घेण्यासाठी जुहू येथील चौकाला त्यांचे नाव देण्यात आले आहेत. या चौकाच्या बोर्डाचे अनावरण रवी टंडन यांच्या पत्नी वीणा टंडन यांच्या हस्ते करण्यात आले आहे. नुकतेच रवीनानं सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर करुन याबाबत माहिती दिली आहे.

रवीनानं शेअर केला व्हिडीओ

रवीनानं एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये रवीनाची आई विणा या रवी टंडन चौक या बोर्डाचे अनावर करताना दिसत आहेत.या व्हिडीओला रवीनानं कॅप्शन दिलं, पप्पा तुमची रोज आठवण येते." रवीनानं काही फोटो देखील शेअर केले आहे.

काय म्हणाली रवीना?

जुहूमधील चौकाला आपल्या वडिलांचे नाव पाहून रवीना खूप भावूक झालेली दिसली. यावेळी ती म्हणाली, "एक अष्टपैलू, ट्रेंड सेट करणारे चित्रपट निर्माता म्हणून चित्रपटसृष्टीतील त्यांचे योगदान खरोखरच महत्त्वपूर्ण आहे. मुंबईत त्यांच्या नावावर एका चौकाला नाव दिले जाईल, हे त्यांच्या मेहनत आणि समर्पणाचे प्रतीक आहे, त्यांचे नाव अशा प्रकारे अमर झालेले पाहून माझे हृदय अभिमानाने भरून येते.”

रवीनाचे चित्रपट

रवीनानं परंपरा, जमाना दीवाना, अंदाज अपना अपना, बडे मियां छोटे मियां या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. काही महिन्यांपूर्वी रवीनाचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारानं गौरव करण्यात आला. आता रवीना लवकरच वेलकम टू द जंगल या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुण्यात २१ वर्षीय शिकाऊ डॉक्टर तरुणीनं उचललं टोकाचं पाऊल, नवव्या मजल्यावरून उडी मारत संपवलं आयुष्य

Pune Crime : मद्याच्या नशेत तरुणीचा विनयभंग करणाऱ्या पोलिस हवालदाराला अटक; हवालदाराला निलंबित करण्याचे दिले आदेश

Bail Pola Water Scarcity : पावसाचा खंड! पोळ्याला बोअरवेलच्या पाण्यावर बैलराजाची खांदेमळणी

Marathi News Live Updates : मुंबई उच्च न्यायालयाचा राहुल गांधींना दणका !

Swimming Competition : १३ वर्षीय विदीची ८१ किमी जलतरणात झेप; देश पातळीवर झालेल्यामुर्शिदाबाद स्पर्धेत द्वितीय क्रमांक

SCROLL FOR NEXT