Raveena Tondon Bollywood actress  esakal
मनोरंजन

Raveena Tondon : रविना टंडनच्या मुलीला धक्काबुक्की, अभिनेत्रीचा संताप, 'प्लीज माझ्या मुलीला...'

रविना जेव्हा पद्मश्री पुरस्कार स्विकारण्यासाठी दिल्लीला गेली होती त्यावेळी तिच्यासोबत तिचा मुलगा रणबीर थडानी, मुलगी राशा थडानी उपस्थित होते.

युगंधर ताजणे

Raveena Tondon bollywood actress daughter Rasha Ranbir : बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री रविना टंडनला नुकताच पद्मश्री पुरस्कारानं गौरविण्यात आले. त्यानंतर चाहत्यांनी तिच्यावर कौतूकाचा वर्षाव केला. तिला शुभेच्छा दिल्या. यात आता रविनाच्या मुलीचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यात तिला आणि तिच्या मुलीला धक्काबुक्की झाल्याचे दिसून येत आहे.

रविना जेव्हा पद्मश्री पुरस्कार स्विकारण्यासाठी दिल्लीला गेली होती त्यावेळी तिच्यासोबत तिचा मुलगा रणबीर थडानी, मुलगी राशा थडानी उपस्थित होते. तो पुरस्कार घेऊन आल्यावर रवीना मुंबई विमानतळावर येताच चाहत्यांनी तिच्याभोवती गर्दी केली होती. तो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Also Read - सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

रविनाला पाहिल्यानंतर त्याठिकाणी चाहत्यांची आणखी मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याचे दिसून आले. चाहत्यांना तिथे काय झाले आहे, तिथली परिस्थिती काय आहे हे जाणून घेण्यापेक्षा रविनासोबत फोटो घेण्यावर तिनं अधिक भर दिल्याचे दिसून आले. रविनानं देखील चाहत्यांसोबत फोटो काढले. मात्र त्याचवेळी तिच्या मुलीला धक्काबुक्की झाल्याचे दिसून आले आहे. यानंतर अभिनेत्रीनं उपस्थित चाहत्यांना अशाप्रकारे धक्काबुक्की न करण्याची विनंती केली होती.

राशीला धक्का लागल्यानंतर रविनाचा संताप झाला. तिनं चाहत्यांना अशाप्रकारे न वागण्याचे आवाहन केले होते. काही वेळेपूर्वी रविना, राशा आणि रणबीरचा तो व्हिडिओ व्हायरल झाला असून आतापर्यत त्याला नेटकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले आहे. त्यावेळी रविनानं पापाराझ्झींना पार्टीचे आश्वासनही दिले आहे. रविनाच्या मुलीला चाहत्यांचा एवढ्या मोठ्या प्रमाणात मिळणारा प्रतिसाद पाहून चाहते खूश झाले होते.

सोशल मीडियावर रविनाच्या त्या पोस्टवर वेगानं चर्चा होऊ लागली आहे. त्यावर नेटकऱ्यांनी दिलेल्या प्रतिक्रियाही भन्नाट आहे. रविनाच्या मुलांविषयी सांगायचे झाल्यास तिला एकुण चार मुलं आहेत. मुलगी राशा आणि मुलगा रणबीर यांना रविनानं जन्म दिला आहे. तर छाया आणि पुजाला तिनं दत्तक घेतलं आहे. रविनाची मुलगी राशा ही दिसायला खूप सुंदर असून सोशल मीडियावर तिच्या सौंदर्याचे नेहमीच कौतूक होताना दिसते. तिनं धीरूबाई अंबानी स्कुलमधून शिक्षण घेतले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dengue Cases: डेंग्यूने १२ वर्षीय सोहमचा बळी; वडील अन् बहीणही अतिदक्षता विभागात, सहा दिवस शीतगृहात ठेवावा लागला मृतदेह

Marathi News Live Updates : गणेशोत्सवात पुण्याच्या मध्यवर्ती भागातील बारा प्रमुख रस्त्यांवर जड वाहनांना बंदी

BJP: भाजपमधून १३ पदाधिकाऱ्यांचे निलंबन अखेर मागे, पुन्हा पक्षकार्याची संधी

Mira Bhayandar Paryushan Controversy : भाजप आमदारांचा अजब फतवा! विद्यार्थ्यांच्या डब्यात कांदा-लसूण नको, पर्यूषण पर्व काळात पालकांना शाळेचा मेसेज, राजकीय वाद पेटला

Indian Army Success Story: शेतकरी कुटुंबातील हर्षची भरारी! वयाच्या २४व्या वर्षी भारतीय सैन्यात लेफ्टनंट; आई गृहिणी, वडील शेतकरी, मुलाची प्रेरणादायी काहाणी

SCROLL FOR NEXT