actress raveena tondon
actress raveena tondon Team esakal
मनोरंजन

शुटींग नव्हे तर चक्क शेतात काम करताना दिसली रविना; आणि...

युगंधर ताजणे

मुंबई - बॉलीवूड अभिनेत्री रविना टंडन (bollywood raveena tondon) सोशल मीडियावर अॅक्टिव्ह (social media) असणारी अभिनेत्री (actress) आहे. आपल्या वेगळ्यापणामुळे ती चाहत्यांच्या चर्चेचा विषय असते. आताही ती चर्चेत आली आहे त्याचे कारण तिनं सोशल मीडियावर शेअर केलेला फोटो. 90 च्या दशकांमध्ये आपल्या अभिनयानं प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करणारी अभिनेत्री म्हणून रविनाचे नाव घेता येईल. रविना आता यशच्या केजीएफच्या दुस-या भागामध्ये दिसणार आहे. कोरोनाच्या दुस-या लाटेत कोरोनानं आपल्या फार्म हाऊसवर आराम करणं पसंत केलं आहे. (Raveena tondon video posts proof after users ask she really worked on her farm)

रविनाचा (raveena work in farm) शेतात काम करतानाचा व्हिडिओ सोशल (social media) मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. त्याला चाहत्यांचा मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळताना दिसत आहे. अनेकांनी तिला त्यावरुन ट्रोलही केले आहे. कोरोनाचा फटका बॉलीवूडलाही बसला आहे. त्यामुळे अनेक चित्रपटांचे शुटींग रखडले आहे. काहींचे प्रदर्शन लांबणीवर पडले आहे. सध्या रविनानं एका गावातील शेतामध्ये काम करत असल्याचा व्हिडिओ पोस्ट केला आहे. यापूर्वीही तिनं अशाच प्रकारचा फोटो शेअर केला होता. त्यावरुन तिला चाहत्यांनी ट्रोल केले होते.

चाहत्यांनी तिला तु खरचं शेतात काम केलेस का, असा प्रश्न विचारला होता. त्यावरुन तिनं शेतात काम करत असल्याचा व्हिडिओ तयार केला आहे. आणि तो सोशल मीडियावर शेअर केला आहे. एका युझर्सनं विचारले होते की, तु खरचं काम केले आहेस की केवळ फोटोंसाठी असे करत आहेस, त्यामुळे त्या युझर्सला उत्तर देताना अभिनेत्रींनं आपला व्हिडिओ शेअर केला आहे.

हातात फावडे घेऊन तिनं काम सुरु केलं आहे. त्याचा व्हिडिओ शेअर केला आहे. त्याला चाहत्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे. तिनं त्या व्हिडिओला कॅप्शन देताना लिहिले आहे की, हो खरचं, मी शेतात काम केले आहे. मी ज्यावेळी काम करत होते तेव्हा मला ते शुट करत आहे हे माहिती नव्हते. आता मी तुमच्या खात्रीसाठी तो व्हिडिओ शेअर केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharashiv Political Murder: धाराशिवमध्ये मतदान केंद्राबाहेर राजकीय कार्यकर्त्याची हत्या; चार जणांवर गुन्हा दाखल

Latest Marathi News Live Update: इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट जवळ आली - नरेंद्र मोदी

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : सोलापुरात राम सातपुते आणि काँग्रेसमध्ये बाचाबाची

Fact Check : कोरोना लसीसंदर्भातील बातम्यांमुळे लस प्रमाणपत्रात बदल करण्यात आले नाहीत; व्हायरल होत असलेला दावा चुकीचा

जम्मू काश्मीरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश! चकमकीत लष्करचा प्रमुख बासित अहमद डारसह तीन दहशतवादी ठार

SCROLL FOR NEXT