Ravi Kishan Daughter Ishita Shukla Join Defence Force  esakal
मनोरंजन

Ravi Kishan Daughter : प्रसिद्ध अभिनेता रवि किशनची 'इशिता' होणार सैन्यात भरती!

रवि किशन यांच्यावर देखील नेटकऱ्यांनी कौतूकाचा वर्षाव केला आहे. त्यांना शुभेच्छाही दिल्या आहेत.

सकाळ डिजिटल टीम

Ravi Kishan Daughter Ishita Shukla Join Defence Force : राजकारण्यांची मुलं ही राजकारणातच जातात, त्याच क्षेत्रात करिअर करतात असे नेहमी म्हटले जाते. मात्र देशातील एका प्रसिद्ध कलाकाराच्या आणि राजकारणी व्यक्तीच्या मुलीनं वेगळ्याच क्षेत्राची निवड करुन अनेकांना मोठा धक्का दिला आहे. त्या सेलिब्रेटी व्यक्तीचे नाव रवि किशन आहे. ते भोजपूरी चित्रपटांमधील मोठे कलावंत आहे.

बीजेपीचे खासदार असणाऱ्या रवि किशन यांच्या मुलीनं इशिता शुक्लानं आता भारतीय सैन्य दलात जाण्याचा निर्णय घेतला आहे. सोशल मीडियावर या बातमीनं अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे. यापूर्वी कित्येक बॉलीवूड सेलिब्रेटींची मुलं ही मनोरंजन विश्वात आपलं करिअर घडवण्यासाठी आल्याचे दिसून आले. वेगळ्या क्षेत्रामध्ये त्यांनी न जाता परंपरागत क्षेत्राची निवड करत त्यातच समाधान मानले आहे.

Also Read - Internet shutdown : खरोखरच इंटरनेट बंद केल्याने दंगली थांबतात का?

मात्र रवि किशन यांच्या मुलीची गोष्ट वेगळी आहे. त्यांची मुलगी इशिता शुक्लानं सैन्य दलात जाण्याचा निर्णय घेतला आहे. ती बातमी सोशल मीडियावर व्हायरल होताच त्यावर नेटकऱ्यांनी कौतूकाचा वर्षाव केला आहे. तिला खूप साऱ्या शुभेच्छाही दिल्या आहेत. इशिता ही आता २१ वर्षांची आहे. इशिताचं कौतूक करताना एका युझर्सनं लिहिलं आहे की, आम्हाला तुमचा खूप गर्व वाटतो. तुम्ही एक आदर्श उदाहरण बाकींच्यासमोर ठेवले आहे. यापूर्वी असे कधीही घडले नव्हते.

रवि किशन यांच्यावर देखील नेटकऱ्यांनी कौतूकाचा वर्षाव केला आहे. त्यांना शुभेच्छाही दिल्या आहेत. इशितानं २६ जानेवारीच्या परेडमध्ये भाग घेतला होता. एनसीसीमधून २६ जानेवारीच्या परेडमध्ये भाग घेणारी १४८ मुलींमधून ती एकमेव होती. रवि किशन यांनी देखील सोशल मीडियावर ट्विट करुन यासंबंधी एक माहिती दिली आहे.

Ravi Kishan Daughter Ishita Shukla

रवि किशन यांनी लिहिलं आहे की, मला माझ्या मुलीचा गर्व आहे. तिनं प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं एका परेडमध्ये भाग घेतला होता. रवि किशन यांना तीन मुलं आहेत त्यांची नावं रीवा, तनिष्क आणि सक्षम असे आहे. रिवाला वडिलांसारखे चित्रपट क्षेत्रामध्ये यायचे आहे. ५३ वर्षांचे रवि किशन मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध नाव आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Who is Praful Hinge? वैभव-यशस्वीला रोखण्यासाठी SRH ने विदर्भच्या पोट्ट्याला पदार्पणाची दिली संधी; जाणून घ्या त्याची प्रेरणादायी कहाणी

Success Story: शेतकरी कुटुंबातील मुलाची 'एनडीएत' भरारी; अमेय साळुंखेंचा देशात 34 वा क्रमांक, लहानपणीच पितृछत्र हरपलं, आईने कष्टाने वाढवलं..

India Monsoon Update 2026 : यंदा ‘एल निनो’ मुळे पावसात घट होण्याची शक्यता, हवामान विभागाचा मान्सूनबाबत चिंताजनक अंदाज

Sangamner Concert: संगमनेरकरांची अजरामर आठवण; बाळासाहेब थोरात-आशा भोसले यांचे जिव्हाळ्याचे नाते, कॉन्सर्टमुळे मनात कायम घर!

Big Breaking : IPL 2026 च्या वेळापत्रकात बदल, चेन्नई सुपर किंग्स अन् गुजरात टायटन्सच्या चाहत्यांसाठी महत्त्वाची बातमी... कारण काय?

SCROLL FOR NEXT