Ravindra Mahajani Death Esakal
मनोरंजन

Ravindra Mahajani Death: 'तो हिरो असायचा अन् मी त्याच्या मागे...', रवींद्र महाजनींच्या आठवणीत अशोक सराफ भावूक

Vaishali Patil

Ravindra Mahajani Death: शनिवारची सकाळ मनोरंजन विश्वासाठी खुपच दुख:द ठरली. मराठी मनोरंजन विश्वातील जेष्ठ मराठी अभिनेते रवींद्र महाजनी यांच्या निधनाची बातमी समोर आली.

शुक्रवारी तळेगाव दाभाडेजवळील आंबी गावातील त्याच्या घरी मृतावस्थेत सापडले. त्यांच्या खोलीमधून वास येत असल्याची माहिती शेजारच्यांनी पोलिसांना दिली. एका बंद खोलीत शुक्रवारी सायंकाळी रात्री उशिरा त्यांचा मृतदेह आढळला.

वयाच्या 77 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनावर अनेक कलाकार आणि राजकिय मंडळींनी देखील शोक व्यक्त केला आहे. अभिनेते अशोक सराफ यांनी देखील त्यांच्या मृत्यूच्या बातमीवर शोक व्यक्त केला आहे.

एका वृत्तवाहिनीशी बोलतांना अशोक सराफ यांनी रवींद्र महाजनी यांच्यासोबत केलेल्या कामाच्या आठवणींना उजाळा दिला. मराठी मनोरंजन विश्वाने एक सुंदर आणि देखणा अभिनेता गमावला असं त्यांनी सांगितलं.

ते म्हणतात की, हे खूप वाईट घडलं आहे. रवींद्र महाजनी हिरो आणि अशोक सराफ हे साईडला असे बरेच चित्रपट त्यांनी एकत्र केले होते. अनेक यशस्वी चित्रपट त्यांनी एकत्र केलं.

पुढे ते म्हणतात, 'एक चांगला माणूस , चांगला मित्र गेल्याचं खूप दुःख होतंय. एक चांगला नट, मित्र गमावल्याचं दुःख त्याच्या मनात कायम राहील.

तो नेहमी हसत खेळत वावरणारा, हसमुख चेहऱ्याचा नट होता. प्रामाणिकपणा हा त्याच्यातला सर्वात मोठा गुण होता, तो प्रत्येक भूमिका उत्तम करायचा.

तो जे करायचा ते मन लावून करायचा आणि याच कारणाने तो त्या काळातला एक यशस्वी नट होता'

रवींद्र महाजनी यांना त्यांच्या देखण्या रुपामुळं मराठीतील मनोरंजन विश्वातील विनोद खन्ना म्हणायचे. त्यांनी 1975 ते 1990 चा काळ आपल्या अभिनयानं खुप गाजवला. मुंबईत टॅक्सी चालक म्हणुन काम करणारे रवींद्र महाजनी यांनी अभिनय क्षेत्रात आपलं एक वळय तयार केलं होतं. 'झुंज' चित्रपटातून त्यांनी अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं.

देखण अन् रुबाबदार रुप, दमदार अभिनय, जोरदार आवाजाच्या जोरावर त्यांनी अनेक चित्रपट गाजवले. रवींद्र महाजनी यांचा मुंबईचा फौजदार हा चित्रपट तर आजही हिट आहे.

त्यांचा देवता 'झुंज', 'आराम हराम आहे', 'लक्ष्मी', 'लक्ष्मीची पावलं', 'गोंधळात गोंधळ' हे चित्रपट खूप गाजले. मात्र त्यांच्या मृतदेह अशा अवस्थेत आढळल्याने मराठी चित्रपटसृष्टीला धक्का बसला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानला चीनची सक्रिय मदत; लष्कर उपप्रमुखांची माहिती

WI vs AUS: ६ पावलं पळाला, स्वतःला दिलं झोकून; Pat Cummins चा अविश्वसनीय झेल, Viral Video नक्की पाहा

Miraj News : कौटुंबिक वादातून कीटकनाशक पिवून पिता पुत्राने संपविले जीवन

Vijay Pawar: बीड लैंगिक छळ प्रकरणातल्या विजय पवारचे कारनामे! RTE कायद्याला जुमानत नव्हता, सरकारी कार्यालयात घातला होता गोंधळ

Indian Railways New Menu : रेल्वे मंत्रालयानं जाहीर केलेलं नवं ‘मेन्यू कार्ड’ तुम्ही पाहिलं का?

SCROLL FOR NEXT