ravindra mahajani last movie was panipat with son gashmeer mahajani  SAKAL
मनोरंजन

Ravindra Mahajani Death: हा ठरला रविंद्र महाजनींचा शेवटचा सिनेमा, मुलगा गश्मीर सोबत अखेरीस केलं काम

विशेष गोष्ट म्हणजे रविंद्र यांनी कारकीर्दीचा शेवटचा सिनेमा त्यांनी मुलासोबत केला.

Devendra Jadhav

Ravindra Mahajani Gashmeer Mahajani News: रविंद्र महाजनी यांच्या निधनाने मराठी मनोरंजन विश्वात एकच खळबळ उडाली आहे. रविंद्र महाजनी यांचं वयाच्या ७७ व्या वर्षी निधन झालं.

रविंद्र यांचा मुलगा गश्मीर महाजनी मराठी - हिंदी मनोरंजन विश्वात सक्रीय आहे. रविंद्र महाजनी यांच्या शेवटच्या क्षणी त्यांचं कुटूंब त्यांच्यासोबत नव्हतं हे दुर्दैव. विशेष गोष्ट म्हणजे रविंद्र यांनी कारकीर्दीचा शेवटचा सिनेमा त्यांनी मुलासोबत केला.

(ravindra mahajani last movie was panipat with son gashmeer mahajani)

हा ठरला रविंद्र महाजनी यांचा अखेरचा सिनेमा

रविंद्र महाजनी आयुष्याच्या शेवटच्या कारकीर्दीत इतकं काम करत नव्हते. पण अशातच त्यांना एका सिनेमाची ऑफर आली. आणि तोही ऐतिहासीक.

या सिनेमात रविंद्र महाजनी यांनी मुलगा गश्मीर महाजनी सोबत काम केलं. हा सिनेमा म्हणजे पानीपत.

२०१९ ला आलेल्या पानीपत सिनेमात रविंद्र महाजनी यांनी मल्हारराव होळकरांची भुमिका साकारली तर गश्मीरने तुकोजीवार होळकरांची भुमिका साकारली.

दोघा बाप लेकाने एकत्र काम केलं. पण दुर्दैव म्हणजे.. रविंद्र महाजनी आयुष्याच्या अखेरच्या घटका मोजत असताना गश्मीर त्यांच्याजवळ नव्हता.

कुठे घडली घटना?

पुण्यातील तळेगाव दाभाडे येथील एक्सरबीया सोसायटी, MIDC रोड, आंबी येथे भाड्याच्या घरात महाजनी राहत होते. त्यांचा मृतदेह येथील बंद फ्लॅटमध्ये मिळून आला आहे.

ते गेले ७-८ महिन्यांपासून या ठिकाणी एकटेच राहत होते. दरम्यान दोन ते तीन दिवसांपूर्वी मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.

रविंद्र महाजनींची कारकीर्द

अभिनेते रवींद्र महाजनी यांचा जन्म बेळगावमध्ये झाला, त्यानंतर त्यांचं बालपण हे मुंबईत गेलं. त्यानंतर पुढे रवींद्र महाजनी यांनी व्ही. शांताराम-दिग्दर्शित झुंज या मराठी चित्रपटाद्वारे चित्रपटक्षेत्रात पदार्पण केले.

तसेच त्यांनी भूमिका साकारलेले लक्ष्मी ( १९७८), दुनिया करी सलाम (१९७९), गोंधळात गोंधळ (१९८१), मुंबईचा फौजदार (१९८५) हे चित्रपट विशेष गाजले. त्यांनी प्रामुख्याने मराठी, हिंदी व गुजराती चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL: शुभमन गिल पळत गेला अन् हवेत झेपावत घेतला भन्नाट कॅच! श्रीलंकेची जमलेली जोडी फोडली, पाहा Video

नरेंद्र मोदींचा नेपाळच्या पंतप्रधानांना फोन! भारतीय नागरिकांच्या मदतीसाठी हेल्पलाईन क्रमांक जारी

Pharmacy Direct Second Year: फार्मसी थेट द्वितीय वर्ष प्रवेशाची तिसरी यादी जाहीर; १२०८ विद्यार्थ्यांना संधी, ९४१ जणांना पसंतीचे महाविद्यालय

ICC Test Ranking मध्ये उलथापालथ! बुमराहचं वर्चस्व संपलं, ऑस्ट्रेलियन दिग्गजाने हिसकावली नंबर-१ची खुर्ची

IND vs SL, 2nd Test, 4th Day: श्रीलंकेला आघाडी घेण्यात यश, पण भारताची सामन्यावर मजबूत पकड; सूरियाबंदाराचं शतक हुकलं

SCROLL FOR NEXT