the kapil show, good news,Reason behind closing show  
मनोरंजन

कपिल शर्माने पुन्हा दिली गुडन्यूज; चाहाते नाराज कारण...

सकाळवृत्तसेवा

मुंबई:प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा शो म्हणजे 'द कपिल शर्मा शो' कपिल शर्मा, भारती सिंह, कृष्णा यांसारखे विनोद वीर या शो मधून प्रेक्षकांना खळखळून हसवतात. गेली अनेक वर्ष या शोनं प्रत्येकाच्या मनात अढळ स्थान निर्माण केलं आहे. या शोमुळे लोक तणावमुक्त होतात. यातील कलाकारांच्या विनोदाचे आणि वेगवेगळ्या प्रसंगाचे सगळेच कौतुक करतात. अनेक चित्रपटांचे निर्माते, दिग्दर्शक आणि कलाकार या शोमध्ये त्यांच्या चित्रपटाचे प्रमोशन करायला येतात. कपिल आणि त्याच्या टीमचे चाहते खूप आहेत. अनेक लोक या शोचा रिपीट टेलिकास्ट ही मिस करत नाहीत एवढी लोकप्रियता 'द कपिल शर्मा शो' ने मिळावली आहे.


काही दिवसांपूर्वी कपिल शर्मा शो लवकरच बंद होणार आहे अशी चर्चा सोशल मीडियावर सुरू होती. कपिल सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव्ह असतो. त्याच्या ट्विटर अकाऊंटवरून तो नेहमी आपल्या फॅन्स सोबत गप्पा मारत असतो.

अशाच एका ट्विटरवरील चॅट सेशनमध्ये कपिलला एका चाहत्यांनी शो बंद करण्याबाबतचे कारण विचारले. त्यावर कपिलने ट्विट करून उत्तर दिले की, 'मी लवकरच दुसऱ्यांदा बाबा होणार आहे. त्यामुळे मला माझ्या पत्नीसोबत घरी राहायचं आहे. कपिलने पहिल्यांदाच सोशल मीडियावर दुसऱ्यांदा बाबा होणार असल्याचं जाहीर केलं.

'द कपिल शर्मा शो' फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात बंद होणार आहे.' या ट्विटमधून कपिलने सर्वांना  गुडन्यूज दिली. त्यानंतर सोशल मीडियावर कपिलवर शुभेच्छांचा वर्षाव झाला. पण 'द कपिल शर्मा शो' बंद होणार यामुळे चाहते नाराज झाले. 

हा शो या आधी सुनील ग्रोवर या कलाकारासोबत झालेल्या भाडणांमुळे बंद झाला होता.पण कपिलने नवीन टीम तयार करू पुन्हा नव्याने हा शो सुरु केला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganeshotsav Traffic Rules: गणेशोत्सवात पुणे मध्यवर्ती भागातील हलक्या मालवाहू वाहनांना पहाटे २ ते सकाळी ११ पर्यंतच लोडिंग-अनलोडिंगची मुभा

Education Alert: शिक्षकांच्या आंदोलनामुळे शाळा बंद राहू नयेत; आरोग्य, बाल विकास, ग्रामपंचायत विभागाला सूचना

1980s AI Photo Trend: ChatGPT वरील एक फोटो पर्यावरणाला पडतोय महागात? व्हायरल AI फोटो 'ट्रेंड'मागचं धक्कादायक वास्तव

VARUN CHAKRAVARTHY: अफगाणिस्तानविरुद्ध भारताच्या विजयाला मोठं ग्रहण! वरुण चक्रवर्ती मालिकेतून बाहेर; एशियन गेम्सही मुकण्याची शक्यता

Road Accident: पोळ रांजणगावजवळ भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत लासूरगावच्या २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT