rekha 
मनोरंजन

व्हिडिओ: अभिनेत्री रेखा म्हणाली, 'प्यार का इजहार तो है लेकिन उसका नाम लेने की इजाजत नही..'

दिपाली राणे-म्हात्रे, टीम ई सकाळ

मुंबई- बॉलीवूडची एव्हरग्रीन अभिनेत्री रेखाच्या चाहत्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे. रेखाला पडद्यावर पाहु इच्छिणा-यांसाठी रेखा एक सरप्राईज घेऊन आली आहे. अभिनेत्री रेखा छोट्या पडद्यावर आता तिची जादू दाखवण्यासाठी सज्ज झालीये?. रेखाचा एक व्हिडिओ नुकताच व्हायरल होतोय यामध्ये ती तिच्या आवडत्या गाण्यासोबत प्रेमाची वाट पाहत असल्याचं सांगतेय. का म्हणतेय रेखा असं वाचा.. 

रेखाच्या या व्हिडिओमध्ये ती सुरुवातीला तिच्या जबरदस्त अंदाजात 'गुम है किसी के प्यार मे' हे गाणं गाताना दिसतेय. यानंतर रेखा म्हणते 'हे गाणं माझ्या हृदयाच्या अत्यंत जवळचं गाणं आहे. यामध्ये एक गोष्ट लपली आहे तिथे प्रेमाची वाट तर पाहतेय मात्र त्याचं नाव घेण्याची परवानगी नाहीये.' रेखाचा हा जबरदस्त अंदाज प्रेक्षक पुन्हा पुन्हा पाहत आहेत.

या व्हिडिओमध्ये रेखा पुढे म्हणते, 'जेव्हा मन कोणाच्या प्रेमात दिवस-रात्र हरवून जात असेल तेव्हा ते प्रेम त्याची एक प्रकारे पूजा केल्यासारखं बनतं. या गाण्याने विराटच्या प्रेमकथेला जन्म दिला आहे. जिथे कर्तव्याच्या वाटेवर चालताना त्याला त्याचं प्रेमाचा त्याग करावा लागतो.'   

अभिनेत्री रेखाचा हा व्हिडिओ म्हणजे स्टार प्लस वाहिनीवरिल 'गुम है किसी के प्यार मे' मालिकेचा प्रोमो आहे. या मालिकेत रेखा अभिनय करताना दिसणार असल्याची चर्चा आहे. मात्र रेखाच्या भूमिकेविषयी अजुन निर्मात्यांनी आणि रेखाने काहीच कन्फर्म केलेलं नाही तेव्हा रेखा केवळ प्रोमोचा भाग आहे की मालिकेत देखील काम करणारे याबाबत अजुनतरी काही स्पष्ट झालेलं नाही.

या व्हिडिओमध्ये रेखा तितकीच सुंदर दिसतेय. तिची साडी, लांबसडक मोकळे केस, तिचा पारंपरिक अंदाज, तिच्या दिलखेचक अदा आणि तिची डायलॉगबाजी चाहत्यांना घायाळ करतेय. हा प्रोमो पाहुन रेखाचे चाहते पुन्हा एकदा तिच्या अदांवर फिदा झाले आहेत एवढं मात्र नक्की.  

rekha gum hai kisi k pyar mein promo video goes viral watch here  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Updates: भारत पाक क्रिकेट सामन्याला विरोध शिवसेना महिला आघाडीच्या वतीने निदर्शने

Leopard Terror: 'आंबेगाव तालुक्याच्या आदिवासी डोंगरी भागात बिबट्याचा सलग तीन दिवसांचा वावर': परिसरात भीतीचे वातावरण

Solapur Rain update: 'साेलापूर शहरातील रस्त्यावरुन वाहू लागल्या नद्या'; शनिवारी शहरात ३२.६ मिमी पाऊस; तीन दिवसांपासून ड्रेनेज तुंबलेलेच

Northeast India Earthquake: ईशान्य भारत भूकंपाने हादरला, बंगालपासून भूतानपर्यंतही जाणवले धक्के

IND vs AUS, ODI: स्मृती मानधनासह दोघींची अर्धशतकं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध इतिहासात पहिल्यांदाच घडला 'असा' पराक्रम

SCROLL FOR NEXT