rekha and priyanka chopra Sakal
मनोरंजन

Citadel Premiere: रेखापासून वरुण धवनपर्यंत या स्टार्सनी प्रियांकाच्या ‘Citadel’ या सिरीजच्या प्रीमियरला लावली हजेरी

प्रियांका आणि रिचर्ड सध्या प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित होणाऱ्या या सिरीजच्या प्रमोशनसाठी भारतात आहेत.

Aishwarya Musale

बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि हॉलिवूड अभिनेता रिचर्ड मॅडेन त्यांच्या आगामी 'सिटाडेल' या सिरीजच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. प्रियांका आणि रिचर्ड सध्या प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित होणाऱ्या या सिरीजच्या प्रमोशनसाठी भारतात आहेत.

मुंबईत त्याच्या प्रमोशनसाठी खास प्रीमियर आयोजित करण्यात आला होता. ज्यामध्ये रेखापासून वरुण धवन, नोरा फतेही ते अनुभव सिन्हा, नेहा धुपिया आणि चित्रपट जगतातील नामवंत कलाकार सहभागी झाले होते.

या कार्यक्रमात पोहोचलेल्या एव्हरग्रीन अभिनेत्री रेखाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. रेखा नेहमीप्रमाणे सिल्क साडीत दिसली. ज्येष्ठ अभिनेत्री रेखाने तपकिरी रंगाची सिल्क साडी परिधान केली होती ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत होती.

रेखाने पापाराझींना जोरदार पोज दिली आणि हात जोडून नमस्कार केले. तर अभिनेता वरुण धवन अतिशय फंकी आउटफिटमध्ये दिसला. त्याने बॅगी पँट, काळा टी-शर्ट आणि निळ्या रंगाचे स्टेटमेंट जॅकेट घातले होते.

चित्रपट निर्माते मधुर भांडारकर आणि अनुभव सिन्हा यांनीही सिटाडेलच्या स्क्रिनिंगला हजेरी लावली होती. तर अभिनेत्री अदिती राव हैदरी, अनुषा दांडेकर, गुरफतेह पीरजादा, हर्षवर्धन कपूर, जिम सरभ, सनी लिओन, रकुल प्रीत सिंग, नेहा धुपिया, अली फजल, सयानी गुप्ता, कुब्बरा सैत, नोरा फतेही, अनुष्का सेन, आयेशा शर्मा, नेहा शर्मा, नेहा धूपिया. चौधरी, निखिल द्विवेदी, प्राजक्ता कोळी, सान्या मल्होत्रा, श्वेता त्रिपाठी आणि अनुभव सिंग बस्सी यांसारखे स्टार्सही उपस्थित होते.

प्रीमियरमध्ये प्रियांका चोप्राच्या स्टाईलने सर्वांना आकर्षित केले. प्रिंटेड टील ड्रेसमध्ये देसी गर्ल ग्लॅमरस दिसत होती. प्रियांकाने थाई स्लिट ड्रेसमध्ये रिचर्डसोबत जबरदस्त पोज दिली. दोघांची केमिस्ट्रीही छान दिसत होती. तर रिचर्ड काळ्या रंगाच्या सूटमध्ये डॅपर दिसत होता. ही स्पाय सिरीज 28 एप्रिल रोजी Amazon Prime वर प्रदर्शित होणार आहे. रुसो ब्रदर्सच्या या सिरीजचा एक भाग दर आठवड्याला प्रदर्शित होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! शैक्षणिक सहलींसाठी विद्यार्थ्यांसाठी सहलीत ५० टक्के सवलत; प्रत्येकास १० लाखांचा अपघात विमाही; एसटी महामंडळाचे आगारप्रमुख जाणार शाळांमध्ये

आजचे राशिभविष्य - 19 नोव्हेंबर 2025

Horoscope Prediction : आज तयार होतोय अमला राजयोग; मेष आणि या पाच राशींच्या आर्थिक अडचणींना लागणार पूर्णविराम !

Morning Breakfast Recipe: सकाळी नाश्त्यात रवा पिझ्झा बॉल ट्राय केले का? लगेच लिहून घ्या रेसिपी

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 19 नोव्हेंबर 2025

SCROLL FOR NEXT