Rekha touches Shatrughan Sinha's feet video viral Netizens React  Esakal
मनोरंजन

Rekha: शत्रुघ्न सिन्हांना भेटल्यानंतर रेखा यांनी चरणस्पर्श करत घेतला आशीर्वाद; नेटकऱ्यांकडून कौतुकाचा वर्षाव

रेखा यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे

Vaishali Patil

बॉलिवूडची दिग्गज आणि सदाबहार अभिनेत्री म्हणुन रेखा यांचे नाव आजही घेतले जात. वयाच्या ६९ व्या वर्षीही रेखा खुप फिट आहेत. चित्रपटामध्ये त्या जास्त सक्रिय नसल्या तरी त्यांचे व्हिडिओ आणि फोटो सतत सोशल मिडियावर व्हायरल होत असतो.

त्याचबरोबर इव्हेंट्स आणि पार्ट्यांमध्ये आपल्या लूकमुळे रेखा सर्वांच्या नजरा वेधून घेतात. आता पुन्हा त्यांचा असाच एक व्हिडिओ सोशल मिडियावर होत आहेत. एका पार्टीत त्यांनी केलेल्या कृतीने सर्वांचे लक्ष वेधले आहे.

28 ऑक्टोबरला आंद्रे टिमिन्स यांचा मुलगा लेस्ली टिमिन्सच्या लग्नाच्या रिसेप्शन पार्टीत अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी हजेरी लावली. यावेळी शत्रुघ्न सिन्हाही त्यांची मुलगी सोनाक्षी सिन्हा आणि कुटुंबासह या कार्यक्रमात पोहोचले होते.

या लग्नाच्या रिसेप्शन पार्टीत रेखा यांनी देखील वेगळ्या अंदाजात हजेरी लावली. तर बॉलीवूडचे ज्येष्ठ अभिनेते शत्रुघ्न सिन्हा आणि सदाबहार अभिनेत्री रेखा या कार्यक्रमामुळे सोशल मिडियावर खुपच चर्चेत आले. याचे कारण म्हणजे त्यांचा एक व्हिडिओ जो सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे.

रेखा यांनी शत्रुघ्न सिन्हा यांना पाहताच त्यांच्या पायाला स्पर्श करुन आशीर्वाद घेताला. रेखा शत्रुघ्न सिन्हा यांच्यापेक्षा 8 वर्षांनी लहान आहे. ही कृती पाहिल्यानंतर नेटकरी थक्क झाले. त्यानंतर रेखा यांनी शत्रुघ्न सिन्हा यांची पत्नी पूनम सिन्हा आणि त्यांची मुलगी सोनाक्षी सिन्हा यांनाही मिठी मारली. या व्हायरल व्हिडिओवर नेटकरी प्रतिक्रिया देत आहेत.

एका नेटकऱ्याने लिहिले, "रेखा जींना आदर कसा करायचा हे चांगले माहित आहे." तर दुसऱ्याने लिहिले की, "रेखाजींची स्टाइल एकदम वेगळी आहे." एकाने लिहिले की, "मोठ्यांचा आदर केला पाहिजे हे चांगले आहे."

या पार्टीत रेखा यांनी हिरव्या रंगाची हेवी सिक्वेन्स वर्क साडी नेसली होती. या लूकमध्ये त्या नेहमी प्रमाणे सुंदर दिसत होत्या. सर्वांच्या नजरा त्यांच्यावर खिळल्या होत्या. या पार्टीत सुपरस्टार हृतिक रोशन, त्याचे वडील राकेश रोशन, करण जोहर आणि अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी स्पॉट झाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जंतर मंतर आंदोलन स्थळांच्या यादीतून वगळलं, दिले ३ पर्याय; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारसीनंतर दिल्ली पोलिसांचा निर्णय

Pune News: चाकणमध्ये हृदयद्रावक घटना! मोबाईलवरून वाद, वडिलांच्या दोन थपडा अन् १७ वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू, सायकलनेच दिला सुगावा..

Rahul Gandhi : ज्ञानेश कुमार यांनी माफीचा साक्षीदार व्हावे! राहुल गांधींचा मोर्चाआधी मोठा इशारा, 'एसआयआर' मधील खरे गुन्हेगार दुसरेच..

IND vs NZ : भारतीय संघाला धक्का, स्टार फलंदाजाने लंगडत मैदान सोडले; न्यूझीलंड दौऱ्यासाठी उद्या होणार होता रवाना, पण...

Ladki Bahin Yojana Payment Update : ...तर खात्यात जमा होणार एकत्र 3000 रुपये? लाडकी बहीण योजनेच्या नव्या अपडेटने वाढवली उत्सुकता, नवरात्रीत लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपणार?

SCROLL FOR NEXT