Remo D'Souza  
मनोरंजन

राहत्या घरी मृतावस्थेत आढळला रेमो डिसूझाचा मेहुणा

रेमो डिसूझाच्या सर्व प्रोजेक्ट्समध्ये त्याने सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलं.

स्वाती वेमूल

प्रसिद्ध कोरिओग्राफ आणि दिग्दर्शक रेमो डिसूझाचा (Remo D'Souza) मेहुणा जेसन वॅटकिन्स (Jason Watkins) त्याच्या मिल्लत नगर इथल्या राहत्या घरी मृतावस्थेत आढळला. जेसनची बहीण आणि रेमोची पत्नी लिझेल डिसूझाने (Lizelle D'Souza) इन्स्टाग्राम स्टोरीवर फोटो पोस्ट करत शोक व्यक्त केला. भावासोबतचा बालपणीचा फोटो तिने पोस्ट केला आहे. 'का, तू असं कसं करू शकतोस? मी तुला कधीच माफ करणार नाही', असं लिझेलने या फोटोवर लिहिलं आहे.

'ई टाइम्स'ने दिलेल्या वृत्तानुसार जेसनच्या मृतदेहाला कूपर रुग्णालयात आणलं असून ओशिवरा पोलीस आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करत आहेत. रेमो आणि लिझेल सध्या गोव्यात आहे. एका लग्नसमारंभासाठी ते गोव्याला गेले होते. जेसन वॅटकिन्स गेल्या काही वर्षांपासून चित्रपटसृष्टीत काम करत होता. रेमो डिसूझाच्या सर्व प्रोजेक्ट्समध्ये त्याने सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलं.

रेमोची पत्नी लिझेल ही कॉश्च्युम डिझायनर असून तिने अनेक टेलिव्हिजन शोजसाठी कॉश्च्युम डिझाइन केले आहेत. रेमो आणि लिझेल यांना ध्रुव आणि गॅब्रिएल ही दोन मुलं आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

8th Pay Commission Update: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! दसऱ्यानंतर मुंबईत महत्त्वाची बैठक; पगारवाढ आणि DAबाबत काय चर्चा होणार?

VIDEO: दुष्काळाच्या बैठकीला दोन्ही उपमुख्यमंत्री गैरहजर; महायुतीत नाराजीनाट्याची चर्चा

Masur Fox Attack: मसूरमध्ये कोल्ह्यांची दहशत! वृद्धासह चिमुकली, महिला आणि शेतकऱ्यावर हल्ले

Latest Marathi News Live Update : सोमेश्वर कारखाना निवडणुकीत सुनेत्रा पवार यांचे खाते उघडले; संग्राम सोरटे विजयी

Truck Fire: राष्ट्रीय महामार्गावर धावत्या ट्रकला आग

SCROLL FOR NEXT