Republic Day 2023: Akshay Kumar, Kangana Ranaut to Allu Arjun, celebs extend heartfelt wishes to fans sakal
मनोरंजन

Republic Day 2023 Celebrity Wishesh: बॉलीवूड ते साऊथ.. या कलाकारांनी दिल्या प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा..

अक्षय कुमारपासून ते चिरंजीवीपर्यंत अनेक बड्या कलाकारांनी दिल्या प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा..

सकाळ डिजिटल टीम

Republic Day 2023: आज आपण ७४वा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहोत देशात सगळीकडे उत्साह आनंद साजरा होत आहेत. नवी दिल्लीतील राजपथ येथे आयोजित परेड पाहून लोक हा दिवस साजरा करतात. यंदा कर्तव्यपथावर भव्य सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

बाजारपेठांपासून सार्वजनिक ठिकाणांपर्यंत सर्व काही तिरंग्याने सजले आहे आणि प्रत्येक गल्लीबोळात देशभक्तीपर गाणी ऐकायला मिळतात. या राष्ट्रीय सणाच्या निमित्ताने सिनेविश्वातील सेलिब्रिटीही मागे नाहीत, त्यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवरून चाहत्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

(Republic Day 2023: Akshay Kumar, Kangana Ranaut to Allu Arjun, celebs extend heartfelt wishes to fans)

हेही वाचा: ....इथं तयार होतो आपला लाडका तिरंगा

अक्षय कुमारने शुभेच्छा देताना एक मोठा इशारा दिला आहे. तो लवकरच एक मोठी घोषणा करणार असल्याचे दिसत आहे. त्यांनी लिहिले, "तुम्हा सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा. आपल्या गौरवशाली वारशाची आठवण करून देणारा दिवस. यंदाचा दिवस माझ्यासाठी सर्वात खास असणार आहे. का ते तुम्हाला लवकरच कळेल. जय हिंद."

तर चिरंजीवी यांनी एक भावनिक पोस्ट लिहिली आहे, "स्वातंत्र्याच्या अमूल्य देणगीबद्दल आणि जगातील महान संविधानांपैकी एक संविधान आपल्याला दिलेल्या वीरांना स्मरण आणि अभिवादन.

तर अल्लु अर्जुन म्हणतो, '' सर्व भारतीयांना ७४ व्या प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आपल्या राज्यघटनेच्या अंमलबजावणीचा उत्सव साजरा करूया, ज्यामुळे आपले राष्ट्र सुरुळीत चालले आहे.''

तर कंगना राणावतने ही ट्विट केले आहे, ''बॉलिवूडची धाकड हिरोईन कंगना राणावत ने देखील तिचे सोशल मीडिया अकाऊंट पुन्हा सुरू झाल्यावर तिने बसंत पंचमी आणि प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा, असे म्हंटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Election Commission of India : एसआयआरवरून निवडणूक आयोगातच मतभेद; दोन आयुक्तांनी दहा महिन्यांत १४ वेळा नोंदवले आक्षेप

'काही वाईट असेल ते माझ्याबाबत होऊ दे' बहिणीच्या प्रीमॅच्युअर बाळासाठी जुईची खाटूश्यामबाबांकडे प्रार्थना, अनुभव सांगत म्हणाली...

Asian Games 2026 : क्रिकेटची आवड असलेल्या Jay Meena ने इतिहास रचला! भारताला सॉफ्ट टेनिसमध्ये जिंकून दिले पहिले आशियाई पदक... जाणून घ्या कोण आहे तो?

Marathi News Live Updates : जम्मू-काश्मीरमधील गँगस्टर करनजीत गुग्गाला दिल्लीत अटक

Gold Rate Today: दसऱ्याआधी सोनं स्वस्त! सराफा बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण; तुमच्या शहरात ताजा भाव पाहा

SCROLL FOR NEXT