Rhea Chakraborty late Sushant Singh Rajput esakal
मनोरंजन

Rhea Chakraborty : 'कुणाला घाबरत नाही, पुन्हा येणार'! रिया चक्रवर्तीनं दिलं नेटकऱ्यांना आव्हान

सुशांत सिंग च्या आत्महत्या प्रकरणाला तीन वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यानंतरही रियाला सतत सोशल मीडियावर ट्रोल केलं जातंय.

युगंधर ताजणे

Rhea Chakraborty late Sushant Singh Rajput Girlfriend viral social : बॉलीवूडचा प्रसिद्ध दिवंगत अभिनेता सुशांत सिंग आत्मत्या प्रकरणात त्याची मैत्रीण रिया चक्रवर्तीची देखील पोलिसांनी कसून चौकशी केली होती. त्यानंतर तिच्या नावाची सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा होती. नेटकऱ्यांनी देखील तिच्यावर कडाडून टीका केली होती. आता रियानं तिला ट्रोल करणाऱ्यांना जशास तसे उत्तर दिले आहे.

सुशांत सिंग च्या आत्महत्या प्रकरणाला तीन वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यानंतरही रियाला सतत सोशल मीडियावर ट्रोल केलं जातंय. तिला बॉलीवूडमध्ये प्रोजेक्ट मिळणंही बंद झाल्याचे तिनं सांगितले होते. यावर तिनं आता नेटकऱ्यांना ठणकावून सांगितलं आहे. अनेकांना असे वाटत आहे की, त्या प्रकरणानंतर तिचे करिअर संपले आहे. त्यालाच आव्हान देत अभिनेत्रीनं आपण पुन्हा कमबॅक करणार असल्याचे सांगत चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे.

Also Read - सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

रिया ही आता एमटीव्ही रोडीज १९ मध्ये दिसणार आहे. तिच्या या घोषणेनंतर चाहत्यांनी तिच्यावर कौतूकाचा वर्षाव केला आहे. तिला ट्रोल करणाऱ्यांना ती म्हणते की, अजूनही माझा द्वेष, तिरस्कार करणाऱ्यांना मला सांगायचे आहे की, मी पुन्हा येते आहे. तुम्हाला काय वाटले मी पुन्हा येणार नाही का, पण तसे होणार नाही. मी कुणालाही घाबरत नाही. मला कुणाला घाबरावे असे वाटत नाही. अशा शब्दांत रियानं तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

२०२० मध्ये सुशांत सिंहन या जगाचा निरोप घेतला. त्यानंतर सुशांत सिंहच्या कुटूंबियांनी रिया चक्रवर्तीवर आरोप करत पोलिसांनी तिची चौकशी करावी अशी मागणी केली होती. सुशांतच्या आत्महत्येमध्ये तिचा सहभाग असल्याचा आरोप सुशांत सिंहच्या कुटूंबियांनी तिच्यावर केला होता. आता तीन वर्षानंतर रिया ही एका शो मधून चाहत्यांसमोर येताना दिसते आहे.

रियानं सोशल मीडियावर पोस्ट करत तिच्या नव्या प्रोजेक्टविषयी सांगितले आहे. त्यामध्ये तिनं आपण रोडिजमधून कमबॅक करत असल्याचे म्हटले आहे. मेकर्सनं देखील ती पोस्ट शेयर करुन चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्यावर तिला चाहत्यांनी कमेंट करुन शुभेच्छा दिल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi Air Pollution : राजधानी दिल्लीचा श्वास गुदमरला ! AQI ४९१ वर, हवा बनली विषारी; श्वसन विकारांच्या रुग्णांत प्रचंड वाढ

Video : छत्रपती शिवरायांचं हिंदवी स्वराज्य कसं होतं? तो काळ डोळ्यापुढं आणणारा AI व्हिडिओ व्हायरल; सच्चे मराठे असाल तर नक्की पाहाल

Kolhapur Dentist End Life : पाठीवरील बॅगेत दगड-विटा भरून तलावात उडी; मित्रांना शेवटचा मेसेज, डॉक्टरचा धक्कादायक निर्णय, चिठ्ठी सापडली अन्...

Latest Marathi News Live Update: मेस्सी आज मुंबईत, कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात

१९ डिसेंबरला मराठी माणूस पंतप्रधान होईल, पृथ्वीराज चव्हाणांचं विधान; अमेरिकेतील स्टिंग ऑपरेशनमुळे राजकीय भूकंपाचा दावा

SCROLL FOR NEXT