Rhea Chakraborty Parties With Karan Johar, Gets Trolled By Sushant Singh Rajput's Fans sakal
मनोरंजन

Rhea Chakraborty: हिला लाज वाटत नाही का? करणसोबतच्या पार्टी नंतर रिया चक्रवर्ती ट्रोल

सुशांत सिंह राजपूतच्या चाहत्यांनी तिला चांगलेच धारेवर धरले आहे.

नीलेश अडसूळ

Rhea Chakraborty: बॉलीवूड अभिनेत्री रिया चक्रवर्तीचे नाव काढले तर लोकांच्या डोक्यात तिचा बदल राग आणि शिव्याशाप येतात. सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूनंतर रिया चक्रवर्ती नेटिझन्सच्या निशाण्यावर असते.आता परत ती ट्रोल झाली.

(Rhea Chakraborty Parties With Karan Johar, Gets Trolled By Sushant Singh Rajput's Fans)

अलीकडेच रियाने चित्रपट करण जोहर, सीमा सजदेह, सुजैन खान आणि इतरांसोबत पार्टी करताना दिसली. तिचे गेट-टूगेदरचे फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत. हीच करण जोहर सोबतची रियाची बॉन्डिंग तिच्या अंगाशी आली आहे.

सीमाने, सोमवारी, तिच्या इंस्टाग्राम हँडलवर पार्टीमधील फोटो शेअर केले आणि त्यामध्ये करण, रिया, सीमा, सुझैन एकत्र पोज देताना दिसले. हे फोटो व्हायरल होताच काही लोकांनी रियाला ट्रोल करण्यास सुरुवात केली

इतकेच नव्हे तर तिच्यासोबत फोटो काढल्याने सीमाला देखील सुनावले जात आहे . त्यावर प्रतिक्रिया देताना एका नेटकऱ्याने लिहिले आहे की, 'ओमजी या शोवर बहिष्कार घाला.सीमा तू रियासोबत का हँग आउट करणार आहेस?' तर एकजण म्हणाला, 'ही रिया तिथे का आहे.'

एका कमेंटमध्ये लिहिले आहे की, 'आता मला सुशांत सिंगच्या हत्या मध्ये करण गँगचा संबंध असल्याबद्दल कोणतीही शंका उरलेली नाही. हिला बॉलीवूडमध्ये परत घेऊ नका. हिला तर लाज उरलेली नाही.. आली तोंड घेऊन'

काही आठवड्यांपूर्वी, मुंबईत फॅशन डिझायनर मनीष मल्होत्राच्या स्टार-स्टडेड दिवाळी पार्टीला उपस्थित राहिल्याबद्दल रिया जबरदस्त ट्रोल झाली होती. दरम्यान, रिया बॉलीवूडमध्ये कमबॅक करण्याचा प्रयत्न करत आहे . ती ‘गॅसलाइट’ या चित्रपटामध्ये दिसणार आहे ज्यात सारा अली खान, विक्रांत मॅसी आणि चित्रांगदा सिंग देखील आहेत. रिया रम्मी जाफ्रीच्या २०२१ मध्ये रिलीज झालेल्या 'चेहरे'मध्ये इमरान हाश्मी आणि अमिताभ बच्चनसोबत शेवटची दिसली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT