Sushant Singh Rajput and Rhea Chakraborty  Sakal
मनोरंजन

Sushant Singh Rajput: रियाचं सुशांतसाठी प्रेम आलं उतू...पोस्ट करत म्हणाली

रिया चक्रवर्ती आणि सुशांत सिंग राजपूत दीर्घकाळापासून रिलेशनशिपमध्ये होते, पण त्यांच्या नात्यावर नेहमीच प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते.

सकाळ डिजिटल टीम

रिया चक्रवर्तीने दिवंगत बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतचे त्याच्या वाढदिवसानिमित्त काही न पाहिलेले फोटो शेअर केले आहेत. रिया चक्रवर्ती आणि सुशांत सिंग राजपूत दीर्घकाळापासून रिलेशनशिपमध्ये होते, पण त्यांच्या नात्यावर नेहमीच प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. खरं तर, सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर अभिनेत्याच्या वडिलांनी रिया चक्रवर्तीवर अनेक गंभीर आरोप केले होते.

रिया चक्रवर्तीच्या लेटेस्ट पोस्टबद्दल बोलायचे तर तिने सुशांत सिंग राजपूतसोबत तिचे 2 फोटो शेअर केले आहेत. पहिल्या फोटोत दोघेही कॉफी मगच्या मागे लपलेले दिसत आहेत, तर दुसऱ्या फोटोत सुशांत सिंग राजपूत आणि रिया चक्रवर्ती कारच्या मागच्या सीटवर बसलेले दिसत आहेत.

रिया चक्रवर्तीच्या या फोटोला काही मिनिटांत लाखो लाईक्स मिळाले आहेत. रिया चक्रवर्तीने या फोटोला खूप सुंदर कॅप्शन दिले आहे, तिने कॅप्शनमध्ये लिहिले आहे – इनफिनिटी+ 1. सुशांत सिंग राजपूतच्या या वाढदिवसाला हे कॅप्शन लिहून रियाने अभिनेत्याच्या चाहत्यांची मनं जिंकली आहेत. मात्र, कमेंट बॉक्समध्ये या पोस्टला संमिश्र प्रतिक्रिया मिळाल्या आहेत.

रिया चक्रवर्तीला बऱ्याच दिवसांपासून सुशांत सिंह राजपूतच्या चाहत्यांनी ट्रोल केले होते. आताही ती इंटरनेटवर ट्रोल झाली आहे. सुशांत सिंह राजपूतच्या कुत्र्याच्या मृत्यूनंतर जेव्हा रियाचा एक व्हिडिओ समोर आला तेव्हा लोकांनी तिला पुन्हा ट्रोल केले. या प्रकरणाबाबत बोलायचे झाले तर सुशांतच्या हत्येप्रकरणी रिया चक्रवर्तीवर आतापर्यंत कोणतेही आरोप सिद्ध झालेले नाहीत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT