Best Comedy Short Film Award
Best Comedy Short Film Award esakal
मनोरंजन

आंतरराष्ट्रीय फेस्टिव्हलमध्ये साताऱ्याचा डंका; 'राईस प्लेट'ची पुरस्कारात बाजी

फिरोज तांबोळी

गोंदवले (सातारा) : आंतरराष्ट्रीय शॉर्टफिल्म फेस्टिव्हलमध्ये (International Short Film Festival) साताऱ्याची ‘राईस प्लेट’ (Rice plate) सर्वोकृष्‍ट ठरली आहे. मधुमिता वाईकर (Director Madhumita Waikar) यांनी दिग्दर्शित केलेल्या या फिल्मने यंदाचा उत्कृष्ट विनोदी शॉर्टफिल्म पुरस्कार (Best Comedy Short Film Award) पटकावला आहे. नुकत्याच झालेल्या इंडियन स्टार इंटरनॅशनल (Indian Star International) या शॉर्टफिल्म फेस्टिव्हलमध्ये भारतातून ९२, तर इटली, फ्रान्स, अमेरिका, रशिया, कुर्दीस्तान या देशांतून १६ शॉर्टफिल्म सहभागी झाल्या होत्या. (Rice Plate Short Film Award For Best Comedy Short Film At International Short Film Festival)

मधुमिता वाईकर यांनी दिग्दर्शित केलेल्या या फिल्मने यंदाचा उत्कृष्ट विनोदी शॉर्टफिल्म पुरस्कार पटकावला आहे.

पहिल्याच वर्षात केवळ दीड महिन्यांच्या कालावधीत सहभागी झालेल्या १०८ फिल्ममधून पहिल्या टप्प्यात ५०, तर दुसऱ्या टप्प्यात २० फिल्मस्‌ना उत्कृष्ट नामांकन मिळाले. त्यामध्ये मधुमिता कला अकादमीच्या ‘राईस प्लेट’ने उत्कृष्ट विनोदी शॉर्टफिल्म पुरस्कार मिळविला. या शॉर्टफिल्ममध्ये खाद्य संस्कारातील अनावश्यक दिखाऊपणा व सोपस्कार यावर मार्मिक भाष्य केले असून भुकेसाठी आवश्यक दोन घासांची किंमत काय असते, याबाबत मिश्कीलपणे संदेशही देण्यात आला आहे.

त्यामध्ये बलराम कलबुर्गी, किशोरी क्षीरसागर, ओंकार ताटे, कोमल मोरे, वनराज कुमकर, संजीव आरेकर, प्रतीक्षा जंगम, गायत्री केळकर, वैशाली जेबले, हिमांशू व खुशी जेबले या कलाकारांनी अभिनय केला आहे. राहुल भोंडे यांनी छायाचित्रण, तर आशिष पुजारी व अभिजित वाईकर यांनी संकलन व संगीत संयोजनाची जबाबदारी पेलली. ज्येष्ठ नाट्य-सिने अभिनेता अरुण नलवडे (Actor Arun Nalawade) हे या फेस्टिव्हलचे संस्थापक अध्यक्ष असून संतोष जाधव यांनी आयोजन केले होते. अरुण नलावडे, शिरीष राणे, अनिकेत के. यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.

Rice Plate Short Film Award For Best Comedy Short Film At International Short Film Festival

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharashiv Loksabha election : ...म्हणून ओमराजे निंबाळकर शिंदेंसोबत गेले नाहीत; 'सकाळ'च्या खास मुलाखतीत केला खुलासा

T20 World Cup 2024: BCCI निवड समितीची जय शाह यांच्यासोबत अहमदाबादमध्ये बैठक! टीम इंडियाची घोषणा कधी? अपडेट्स आल्या समोर

Patanjali Products Ban: पतंजलीच्या 14 औषधांवर उत्तराखंडमध्ये बंदी! सुप्रीम कोर्टानं फटकारल्याचा परिणाम

Loksabha election 2024 : बेटों के सम्मान में, 'मर्द' उतरे मैदान मे! ना विजयाची चिंता ना प्रचाराची फिकीर; पुरुषांच्या हक्कासाठी निवडणुकीच्या मैदानात

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

SCROLL FOR NEXT