Richa Chadha Fukrey 3 Bollywood Actress share  esakal
मनोरंजन

Fukrey 3 Richa Chadha : 'बऱ्याचदा तुम्हाला एखादी भूमिका करण्यासाठी....' बॉलीवूडवर रिचानं साधला थेट निशाणा, काय बोलून गेली?

बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री रिचा चढ्ढा ही तिच्या आक्रमक वक्तव्यासाठी ओळखली जाणारी सेलिब्रेटी आहे.

युगंधर ताजणे

Richa Chadha Fukrey 3 bollywood Actress share : बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री रिचा चढ्ढा ही तिच्या आक्रमक वक्तव्यासाठी ओळखली जाणारी सेलिब्रेटी आहे. गेल्या काही दिवसांपासून ती तिच्या परखड बोलण्यामुळे चर्चेत आली आहे. आता तिचा फुकरे ३ नावाचा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. त्याच्या प्रमोशनच्या दरम्यान तिनं केलेला खुलासा हा भलताच धक्कादायक आहे. (लोकल ते ग्लोबल लेटेस्ट अपडेट मिळवा सकाळच्या व्हॉट्सअप चॅनेलवर... फॉलो करण्यासाठी या लिंकवर करा क्लिक)

फुकरे च्या अगोदरच्या चित्रपटांना देखील प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता. त्यानं बॉक्स ऑफिसवर समाधानकारक कमाईही केली होती. मृगदीप सिन्हा यांनी दिग्दर्शित केलेल्या फुकरे च्या तिसऱ्या पार्टची प्रेक्षकांना गेल्या अनेक दिवसांपासून प्रतिक्षा होती. रिचा चढ्ढा,पंकज त्रिपाठी, पुलकित सम्राट या कलाकारांची जुगलबंदी या चित्रपटातून प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

Also Read - Male Andropause: काय सांगता पुरुषांनाही येते रजोनिवृत्ती?

सोशल मीडियावर या चित्रपटाचा ट्रेलर, त्याचे बीटीएस विशेष लोकप्रिय होताना दिसत आहेत. त्यावर नेटकऱ्यांच्या आलेल्या कमेंट्स देखील भन्नाट आहेत. यासगळ्यात चित्रपटाचे प्रमोशन करण्यात व्यस्त असलेल्या रिचानं बॉलीवूडमधील त्या प्रकारावर सडेतोडपणे भाष्य केले आहे. ज्यामुळे पुन्हा नवा वाद तयार होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यापूर्वी देखील रिचानं तिची भूमिका तितक्याच परखडपणे मांडली आहे.

रिचा म्हणते, आम्हाला अमूक एखादी भूमिका साकारण्यासाठी ऑडिशनला सामोरं जावं लागतं. बऱ्याचदा तुमचे मित्र हे देखील तुमचे स्पर्धक असू शकतात. अशावेळी खूप काळजी घ्यावी लागते. तुम्हाला तुमचा सर्वोत्तम परफॉर्मन्स द्यावा लागतो. काहीवेळा मनाविरुद्धही काम करावे लागते. ते सगळ्यात भयानक आहे.

मुद्दा असा आहे की, अमूक एखादी भूमिका जर माझ्यासाठी असेल तर एखाद्या कलाकारानं मोठेपणा दाखवून त्या भूमिकेकरिता माझ्या नावाची शिफारस करायला हवी. पण तेवढा समजूतदारपणा आपल्याकडे आहे का हे तपासून पाहण्याची गरज आहे. बॉलीवूडमध्ये हा प्रकार मोठ्या प्रमाणावर दिसून येतो. अशी खंत रिचानं यावेळी व्यक्त केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT